ETV Bharat / state

क्षणभरात प्रेमात पडणारे सौंदर्यमय कोकण; पाहा नयनरम्य फुलांचा देखावा

पावसाळ्यातील कोकणातले सौंदर्य पाहण्यासाठी तुफान गर्दी सध्या रत्नागिरीत झाली आहे. येथील पडीक जमिनीवरील फुलांचा बहर पाहून मन मोहून जात आहे.

कोकणातील सौंदर्य
author img

By

Published : Aug 31, 2019, 12:28 PM IST

Updated : Aug 31, 2019, 5:37 PM IST

रत्नागिरी - पावसाळ्यातील कोकणातले सौंदर्य पाहण्यासाठी तुफान गर्दी सध्या रत्नागिरीत झाली आहे. येथील पडीक जमिनीवरील फुलांचा बहर पाहून मन मोहून जाते. विविध रंगीबेरंगी फुलांचे ताटवेच्या-ताटवे सध्या कोकणातल्या अनेक कातळावर पाहायला मिळत आहेत. तब्बल दोनशे फुलांच्या विविध छटा सध्या कातळभूमीत पाहायला मिळत आहेत.

कोकणातील निसर्गाचे सौंदर्य; क्षणभरात पडाल प्रेमात

हेही वाचा - गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग

साताऱ्यातील कास पठारावर निळ्या, जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या कास पुष्पांनी पर्यटनला एक नवी दिशा मिळवून दिली, तशाच पद्धतीचे रत्नागिरी-शिरगाव येथील पठारावर दृश्य पहायला मिळत आहे. शिरगावप्रमाणे राजापूरमधील देवीहसोळ, अडिवरे, गुहागरमधील वेळणेश्वर, वाडदई, मासू, हेदवी, काजुर्ली, दापोलीमधील दाभोळ, खेर्डी, चिपळूणच्या मार्गे ताम्हाणे, संगमेश्वरचा घोडवली या भागात विलोभनीय दृष्य सध्या पाहावयास मिळत आहेत.

हेही वाचा - रेल्वेतच गर्भवती महिलेने दिला कन्येला जन्म; कोकण रेल्वे मार्गावरील घटना

कातळावरील फुलांच्या जवळपास २०० प्रजाती कोकणात पाहायला मिळतात. त्यापैकी किटक खाणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. पण, सध्या कोकणाच्या कातळावर 'ड्रॅासेरा इंडिका' ही वनस्पती आढळते. किटक खाणारी ही वनस्पती फक्त कोकणाच्या कातळावर आढळते. कोकणात या फुलांना कातळावरील रानफुले असे संबोधून याचे महत्व लक्षात घेतले जात नाही. कोकणात येणाऱ्या कास पुष्पाला संरक्षित केले तर पावसाळी पर्यटनाला एक वेगळी दिशाच मिळू शकेल. हा निसर्गाचा ठेवा सर्वांनीच जपणे आवश्यक आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला; 24 तासात 28.11 मिमी पावसाची नोंद

Intro:पावसाळ्यात खुलून दिसणारं कोकणचं वैभव

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणातलं सौदर्य बहरतं ते पावसाळ्यात. कातळावरची पडिक जमिन देवभूमी बनते. विविध रंगीबेरंगी फुलांचे ताटवेच्या ताटवे सध्या कोकणातल्या अनेक कातळावर पहायला मिळत आहेत. तब्बल दोनशे फुलांच्या विविध छटा सध्या कातळभुमीत पहायला मिळतायत. साता-यातील कास पठारावर निळ्या, जांभळ्या, पिवळ्या रंगाच्या कास पुष्पांनी पर्यटनला एक नवी दिशा मिळवून दिली तशाच पद्धतीची फुले सध्या कोकणातील विविध कातळांवर पहावयास मिळू लागली आहेत. या फुलांचा जणू सडाच या कातळांवर पडलाय की काय असाच भास होतो....कास पुष्प पठाराने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा लौकीक नोंदवलाय.... अशाच कास पुष्प पठाराचे रत्नागिरी शिरगाव येथे पहावयास मिळतोय...शिरगाव प्रमाणे राजापूरमधील देवीहसोळ, अडिवरे, गुहागरमधील वेळणेश्वर, वाडदई, मासू, हेदवी, काजुर्ली, दापोलीमधील दाभोळ, खेर्डी, चिपळूणच्या मार्गताम्हाणे, संगमेश्वरचा घोडवली या भागात विलोभनीय दृष्य सध्या पहावयास मिळत आहेत. 
कणातील कातळावरची हि फुले रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना अनेक ठिकाणी दिसतात.निळया,जांभळया पिवळया अशा विविध रंगाची हि फुले मन मोहून टाकतात. पिवळ्या रंगाची सोनवी फुले सर्वच ठिकाणी दिसतात. पांढऱ्या रंगाची गेंद फुलं मन मोहून टाकतात.. रत्नागिरीतल्या अनेक कातळसड्यांवर अनेक रंगाची फुले दिसतात. पण या सर्वत आकर्षक फुलं दिसतात ती निळ्या रंगाची फुलं..सितेची असवे म्हणुन या फुलांची ओळख आहे. हिरव्यागार मखमलींची चादर ओढून घेतलेल्या या काळया कातळावरील निळया, जांभळया आणि पिवळया रंगांची हि फुलं पावसाळ्यानंतर सर्वाधिक पहावयास मिळतात...या फुलांना गावाकडे मात्र वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं..कातळावरील फुलांच्या जवळपास २०० प्रजाती कोकणात पहायला मिळतात. त्यापैकी किटक खाणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. पण सध्या कोकणाच्या कातळावर ड्राॅसेरा इंडिका हि वनस्पती आढळते. किटक खाणीरी हि वनस्पती फक्त आणि फक्त कोकणाच्या कातळावर आढळते.कोकणात या फुलांना कातळावरील रानफुले असे संबोधून याचे महत्व लक्षात घेतले जात नाही. कोकणातील कातळावर  निळया जांभळया अशा विविध रंगांच्या फुलांचे ताटवेच्या ताटवेच फुललेले दिसून येतात. साता-यामध्ये कास पुष्प पठाराने पर्यटनाची क्रांतीच घडवलीय... त्याठिकाणी अशाप्रकारच्या जागा संरक्षित केल्या जातात. याप्रमाणे कोकणात येणा-या या कास पुष्पाला संरक्षित केले तर पावसाळी पर्यटनाला एक वेगळी दिशाच मिळू शकेल. पण हा निसर्गाचा ठेवा सर्वांनीच जपण आवश्यक आहे..

Byte - सुधीर रिसबूड, निसर्गप्रेमी
Body:पावसाळ्यात खुलून दिसणारं कोकणचं वैभवConclusion:पावसाळ्यात खुलून दिसणारं कोकणचं वैभव
Last Updated : Aug 31, 2019, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.