ETV Bharat / state

किरीट सोमय्यांनी तक्रार केलेल्या दापोलीतील १० रिसॉर्टची केंद्रीय समितीकडून पाहणी - अनिल परब

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड समुद्रकिनाऱ्याजवळ खरेदी केलेल्या व नंतर उद्योजक सदानंद कदम यांना विकलेल्या जागेत बांधलेल्या रिसॉर्टबाबत यापूर्वी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेकडे तक्रार केली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या मंत्रालयाचे अधिकारी यांनी मुरुड येथे येऊन या रिसॉर्टची पाहणी केली होती.

Priority : Normal
Priority : Normal
author img

By

Published : Jul 6, 2021, 9:24 AM IST

रत्नागिरी - भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे दापोलीतील १० बांधकामांची तक्रार केली होती. सोमवारी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल या मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयातील अधिकारी ए. सुरेश कुमार यांनी मुरुड येथील सीआरझेड कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टची पाहणी केली.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती तक्रार..

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड समुद्रकिनाऱ्याजवळ खरेदी केलेल्या व नंतर उद्योजक सदानंद कदम यांना विकलेल्या जागेत बांधलेल्या रिसॉर्टबाबत यापूर्वी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचेकडे तक्रार केली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या मंत्रालयाचे अधिकारी यांनी मुरुड येथे येऊन या रिसॉर्टची पाहणी केली होती.

किरीट सोमय्यांनी तक्रार केलेल्या दापोलीतील १० बांधकामांची केंद्रीय समितीकडून पाहणी..

तक्रार करण्यात आलेली बांधकामांची पाहणी..

सोमवारी वन व पर्यावरण मंत्रालयाचे नागपूर कार्यालयातील अधिकारी ए. सुरेश कुमार यांनी तक्रार करण्यात आलेली बांधकामाची पाहणी केली. तसेच समुद्राच्या उच्चतम भरती रेषेपासून या बांधकामाचे अंतर किती आहे याची मोजणीही केली तसेच या बांधकामाचे फोटोही काढले.

मुरुड येथील रामदास शेलार, विशाल परदेशी, रत्नाकर खोत, उमेश जोशी, रामचंद्र रेवाळे, सदानंद बोवणे, अरविंद शिंदे यांच्या बांधकामाची पाहणी आज करण्यात आली. दापोलीचे प्रांत शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर, तलाठी संदीप देवघरकर, पाटील यावेळी उपस्थित होते.

सोमवारी केलेल्या पाहणीचा अहवाल केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. या अहवालावर वन पर्यावरण मंत्रालयालाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.