रत्नागिरी - कोकणात वाघ बचाव मोहीमेसाठी अनेक उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. मात्र गुहागर येथील तळवली गावच्या ग्रामस्थांनी जवळपास सव्वाशे वर्षांपासून एक परंपरा जपली आहे. यात एक वेगळ्या प्रकारे वन्य आणि पाळीव प्राण्यांसाठी उपक्रम राबवला जातो. वाघ बारसच्या दिवशी होणाऱ्या या पारंपरिक उत्सवातून प्राणी बचाव आणि एकतेचा संदेश दिला जातो.
हेही वाचा... आईपासून दुरावलेले बछडे पुन्हा आईच्या कुशीत
कोकणात तसे अनेक पारंपारिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. आपल्या पशुधनाच्या रक्षणासाठी दिवाळीत साजरा होणारा वाघ बारस हा देखील त्या पैकीच एक आहे. काही ठिकाणी मुक्या प्राण्यांच्या विषयी असलेले ममत्व आणि त्यांच्या जीविताच्या रक्षणाची काळजी वाहणारे असे सण, यांचे महत्व अनन्य साधारण आहे.
हेही वाचा... नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात 190 रुग्णांना डेंग्यूची लागण, 11 महिन्यात चार संशयित रुग्णांचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील तळवली गावात आजही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. कार्तिकी एकादशीनंतर तळवळी गावातील ग्रामस्थ एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. भात कापणी पुर्ण झाल्यानंतर पाळीव प्राणी मोकाट सोडले जातात. ही गुरे जंगलात गेल्यावर वाघ बिबट्यांपासून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी हा वाघ बारस साजरा केला जातो.
हेही वाचा... 'हा' आहे ५ वर्षाचा 'गुगल बॉय', 'ही' आहे त्याची इच्छा
असा साजरा होतो वाघ बारसचा सण...
वाघ बारस साजरा करण्यासाठी गावातून तांदूळ आणि पैसे गोळा केले जातात. जंगलातील एक विशिष्ट जागा निवडली जाते. त्या ठिकाणी तीन काठ्या एकत्रित बांधून त्या मध्यभागी उभ्या केल्या जातात. पाणवठ्यावर जाऊन पाण्याच्या साहाय्याने नैसर्गिक रंगाचा वापर करुन म्हणजेच कोळसा, दगड, जांभा यांचा वापर करुन काही ग्रामस्थ पुरुष त्यामध्ये तरुणाई आपल्या अंगावर वाघांचे चित्र रेखाटतात, तसेच तोंडावर मुखवटा लावतात. यानंतर त्या काठीच्या सभोवताली वाघाच्या घोषणा देऊन नृत्य केले जाते. हा उपक्रम राबवून लोकांमध्ये एकी निर्माण होऊन वाघाला शांत करावे व प्राणी हत्या थांबवली जावी, असा संदेश यातून दिला जात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. अशा या आगळ्यावेगळ्या प्राणी बचाव मोहीमेची परंपरा जवळपास सव्वाशे वर्षांपासून जपली जात आहे.
हेही वाचा... नांदेड : ११ महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले