चिपळूण (रत्नागिरी) - खेर्डी एमआयडीसीतील व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सामाजिक अंतर न पाळता परप्रांतातून कामगारांना बसमधून आणल्याप्रकरणी शिरगांव पोलीसांनी ही कारवाई केली. या कंपनीत कामासाठी ४२ कामगार आणण्यात आले होते. त्यांना आणताना गाडीचा चालक राजू गुप्ता, ठेकेदार रवी आणि या कामगारांना आणावयास सांगणारा व्यवस्थापक या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
परप्रांतीय कामगारांचा विषय सर्वत्र चर्चिला जात असताना पोलीसांची ही कारवाई लक्षवेधी ठरली आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार कोळेकर करीत आहेत.
हेही वाचा - 'त्या' लोकांची काळजी सरकार घेतंय, म्हणून 'या' प्राण्यांना आम्ही संभाळतोय
तसेच उत्तर प्रदेश मधून ४७ कामगार खेर्डी येथे थ्री एम पेपर मिलमध्ये आणताना कसल्याही प्रकारची नोंद कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आली नव्हती. थ्री एम पेपर मिलला कामगार आयुक्तांनीही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेश ४७ कामगार आणल्याप्रकरणी थ्री एम पेपर मिल सर्व बाजूंनी अडचणीत आली आहे. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापक, बस चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.