ETV Bharat / state

केळशी बोट दुर्घटना : बेपत्ता दोन खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला - ratagiri district news

दापोली तालुक्यातील केळशी येथील समुद्रकिनारी मच्छिमारीसाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना घटली होती. यातील दोघा बेपत्ता खलाशांपैकी एकाचा मृतदेह याच बोटीच्याच जाळीत सापडला आहे.

ratnagiri news
ratnagiri news
author img

By

Published : Aug 16, 2020, 1:05 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील केळशी येथील समुद्रकिनारी मच्छिमारीसाठी गेलेली बोट बुडाल्याची दुर्घटना शनिवारी (15 ऑगस्ट) संध्याकाळी घडली होती. या दुर्घटनेत 4 जणांना वाचविण्यात यश आले होते. तर, 2 जण बेपत्ता होते. या दोघांपैकी एका खलाशाचा मृतदेह केळशी किनारी मिळाला आहे. तर दुसऱ्या बेपत्ता खलाशाचे शोधकार्य सुरू आहे.

केळशी येथील मकबुल शेखअली चाऊस यांच्या मालकीची ‘माशाल्ला’ नावाची यांत्रिक बोट शनिवारी (15 ऑगस्ट) मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. मात्र, वादळामुळे पुन्हा खाडीत येतेवेळी अचानक मोठी लाट आली. त्यावेळी बचावासाठी वळण घेत असताना बोटीवर लाट आपटून बोट उलटली. यामधील बोट मालक मकबूल शेखअली चाऊस , सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे चारजण बोटीबाहेर फेकले गेले व त्यांच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या बोटीवरील लोकांनी त्यांना ताबडतोब मदत करून वाचवले.

तर इतर दोघे शहादत इब्राहिम बोरकर व गणी इस्माईल खमसे हे बेपत्ता झाले होते. कालपासून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच दापोली तहसीलदार वैशाली पाटील,परवाना अधिकारी दीप्ती साळवी, तलाठी पाटील आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

दरम्यान, शहादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह रविवार (16 ऑगस्ट) सकाळी बोटीच्याच जाळ्यात सापडला. तर दुसरा खलाशी बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.