ETV Bharat / state

"किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे 2022 ते 2024 दरम्यान कळेलच" - प्रसाद लाड - संजय राऊत प्रसाद लाड

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज "कश्तियां डूब जाती है और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है" असं ट्विट केलं होतं. त्यावर "किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे 2022 ते 2024 दरम्यान कळेलच" असं म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP state vice president Prasad Lad reaction on Sanjay Raut's tweet
"किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे 2022 ते 2024 दरम्यान कळेलच" - प्रसाद लाड
author img

By

Published : Feb 8, 2021, 9:00 PM IST

Updated : Feb 8, 2021, 9:08 PM IST

रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळाला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज "कश्तियां डूब जाती है और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है" असं ट्विट केलं होतं. त्यावर "किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे 2022 ते 2024 दरम्यान कळेलच" असं म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

या ट्विट वरून भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खा. राऊत यांच्यासह शिवसेनेला फटकारलं आहे. लाड म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी एक-दीड वर्षांपूर्वी शिवसेनेबरोबर जे काही झालं ती सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवली, हस्तियाँ किसकी कब कब डूबेगी हे शिवसेनेला 2022 ते 2024 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेल. ही महाराष्ट्राची जनता त्यांना दाखवून देईल. कारण स्वाभिमान विकलेली, तत्वनिष्ठा विकलेली, स्वतःचं अस्तित्व संपलेली शिवसेना आज महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलीय, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत खा. संजय राऊत साहेबांना उत्तर आम्ही 2022 ते 2024 च्या कालावधीत देऊ. असे लाड म्हणाले.

"किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे 2022 ते 2024 दरम्यान कळेलच" - प्रसाद लाड

ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने महाविकासआघाडीला जागा दाखवली..

ते पुढे म्हणाले, की आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील जनतेने महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली आहे. 60 टक्के पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकल्या याचा आम्हाला अभिमान आहे. अमित शाहांच्या दौऱ्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्र आशेने पाहतोय, येणाऱ्या काही दिवसांत किसकी हस्तियाँ कब डूबेगी हे लोकांना कळेलच, असं म्हणत लाड यांनी खा. राऊत यांच्यासह शिवसेनेवर प्रहार केला आहे.

कायापालट झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही..

दरम्यान महाराष्ट्रात कायापालट झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असंही प्रसाद लाड यावेळी म्हणाले. तसेच नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांवर बोलायचं, म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं आहे अशी बोचरी टीका लाड यांनी केली.

हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'त्या' ट्विट्सची चौकशी होणार - गृहमंत्री अनिल देशमुख

Last Updated : Feb 8, 2021, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.