ETV Bharat / state

'शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला'; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप आक्रमक - prasad lad news

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या महाविकास आघाडीसंबंधी प्रस्तावावर वक्तव्य केले होते. आता याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय.

prasad lad speaks on shivsena
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय.
author img

By

Published : Jan 20, 2020, 5:41 PM IST

रत्नागिरी - शिवसेनेने 2014 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्याचे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय.

'आम्हाला फसवलं गेलं' ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेनेने दिशाभूल केली असून, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. आज (20जानेवारी) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेला सावरकरांच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.

निवडणुकीच्या आधी शिवसेना सावरकरांच्या मुद्यावर कंबरडे मोडायची भाषा करत होती. आता सत्तेसाठी लाचार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथा नाही घातल्या तरी चालतील, त्यांनी फक्त 'सावरकर आमचा अभिमान आहे', हे बोलून दाखवावे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

सावरकरांबद्दल निर्भीडपणे बोलणाऱ्या खासदार संजय राऊत यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. संजय राऊत या खऱ्याखुऱ्या हिंदुत्ववादी माणसाने केलेल्या मागणीचे आम्ही समर्थन करत असल्याचे लाड यांनी यावेळी सांगितले.

Intro:चव्हाणांच्या वक्तव्यामुळे 'आम्हाला फसवंल गेलं ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरली' - प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथ घालू नये, फक्त तोंड उघडून बोला की सावरकर आमचा अभिमान आहे - लाड

रत्नागिरी, प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेने २०१४ मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्याच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना पहायला मिळत आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. आम्हाला फसवंल गेलं ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरली आहे. शिवसेनेने दिशाभूल केली, शिवसेनेनी भाजपच्या पाठित खंजीर खुपसला. शिवसेनेच्या मनात हि आघाडी करायची होती, तर भाजपला सांगायला हवं होतं असंहि सांगायला लाड विसरले नाहीत. रत्नागिरी सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

तर सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेनेवर प्रसाद लाड यांनी उपहासात्मक टिका केली. निवडणुकीच्या आधी सावरकरांच्या मुद्यावर कंबरडे मोडायची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रेमाचा सल्ला दिलाय. आता सत्तेसाठी लाचार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथ घालू नये, फक्त तोंड उघडून बोला की सावरकर आमचा अभिमान आहे, अशी खोचक टीका लाड यांनी केली आहे. सावरकरांबद्दल निर्भीडपणे बोलणाऱ्या खासदार संजय राऊतांचे लाड यांनी कौतुक करत अभिनंदन केलंय. संजय राऊत या खऱ्याखुऱ्या हिंदुत्ववादीमाणसाने केलेल्या मागणीचे आम्ही समर्थन करत असल्याचं म्हणत लाड यांनी राऊत यांचं अभिनंदन केलं आहे..

Byte - प्रसाद लाड, भाजप प्रदेश उपाध्यक्षBody:चव्हाणांच्या वक्तव्यामुळे 'आम्हाला फसवंल गेलं ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरली' - प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथ घालू नये, फक्त तोंड उघडून बोला की सावरकर आमचा अभिमान आहे - लाडConclusion:चव्हाणांच्या वक्तव्यामुळे 'आम्हाला फसवंल गेलं ही शिवसेनेची वल्गना आता खोटी ठरली' - प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांनी कंबरड्यात लाथ घालू नये, फक्त तोंड उघडून बोला की सावरकर आमचा अभिमान आहे - लाड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.