ETV Bharat / state

माझा सनातनशी संबंध जोडणे हे विरोधकांचं षड्यंत्र - नविनचंद्र बांदिवडेकर

author img

By

Published : Mar 27, 2019, 6:21 PM IST

माझा सनातन संस्थेशी संबंध जोडणे हे एक षड्यंत्र असून यामागे शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा हात असल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकरांनी केला आहे.

नविनचंद्र बांदिवडेकर

रत्नागिरी - माझा सनातन संस्थेशी संबंध जोडणे हे एक षड्यंत्र असून यामागे शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा हात असल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकरांनी केला आहे. बुधवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि स्वाभिमानी पक्षाला आपली उमेदवारी डोईजड जाईल म्हणून माझा सबंध थेट सनातनशी जोडला गेला, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बांदिवडेकर

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, काँग्रेसच्या विधान परिषद आमदार हुस्नबानो खलिफे, राजीव किर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आघाडीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नवीनचंद्र बांदिवडेकरांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर सनातनशी संबध असल्याचा आरोप झाला होता.सोशल मीडियावरही बांदिवडेकर ट्रोल झाले होते. नेटिझन्सनी काँग्रेस आणि बांदिवडेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही बांदिवडेकरांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती.

काँग्रेस हायकमांडकडने देखील बांदिवडेकरांकडे स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, सनातनशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत केवळ समाज म्हणून त्यावेळी कार्यक्रमात गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. सर्व घडामोडीनंतर काँग्रेसने बांदिवडेकरांची उमेदवारी कायम असल्याचे जाहीर केले. या वादानंतर आज पहिल्यांदाच रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सर्व षड्यंत्र असल्याचा त्यांनी आरोप केला.
माझे तिकिट कापले जावे हा विरोधकांचा उद्देश होता. तसेच एवढे करूनही उमेदवारी कायम राहिली तर काँग्रेसची पारंपरिक मते दूर जावीत हा यामागे विरोधकांचा उद्देश होता, असा आरोप बांदिवडेकरांनी केला आहे. ३० मार्चला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आज स्पष्ट केले.

Intro:माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे हे विरोधकांचं षडयंत्रच

नविनचंद्र बांदिवडेकर यांचा आरोप

शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमानला केलं लक्ष

रत्नागिरी, प्रतिनिधी

माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे म्हणजे हे एक षडयंत्र असून यामागे शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा हात असल्याचा थेट आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवीनचंद्र बांदीवडेकर यांनी केला आहे.. आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बांदिवडेकर यांनी याचा उलगडा केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, काँग्रेसच्या विधान परिषद आमदार हुस्नबानो खलिफे, राजीव किर आदी पदाधिकारी उपस्थित होते..
आघाडीकडून रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघासाठी नवीनचंद्र बांदीवडेकरांच्या नावाची घोषणा झाली.. त्यानंतर काहीच दिवसांत बांदीवडेकरांचा संबध थेट सनातनशी असल्याचा आरोप झाला.. आणि सोशल मिडियावरही बांदीवडेकर ट्रोल झाले.. नेटिझन्सनी काँग्रेस आणि बांदिवडेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.. काँग्रेसचा उमेदवार सनातनचा समर्थक? असा थेट आरोप झाला.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनीही बंदीवडेकरांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला.. त्यामुळे बांदिवडेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती. काँग्रेस हायकमांडकडने देखील बांदिवडेकरांकडे स्पष्टीकरण मागितले होते.. मात्र सनातनशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत केवळ समाज म्हणून आपण त्यावेळी तिथे गेलो असल्याचं बांदिवडेकरानी स्पष्ट केलं होतं.. त्यामुळे एवढया सर्व घडामोडीनंतर काँग्रेसने बांदिवडेकरांची उमेदवारी कायम असल्याचं जाहीर केलं होतं.. एकूणच या वादानंतर बांदिवडेकरानी आज पहिल्यांदाच रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सर्व षडयंत्र असल्याचा आरोप केला.. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि स्वाभीमान पक्षाला आपली उमेदवारी डोईजड जाईल म्हणून माझा सबंध थेट सनातनशी जोडला गेला. यामागे शिवसेना आणि स्वाभिमानचा हात असल्याचा थेट आरोप नवीनचंद्र बांडीवडेकरांनी केला. माझं तिकिटंच कापलं जावं हा यामागे विरोधकांचा उद्देश होता.. तसेच एवढं करूनही उमेदवारी कायम राहिली तर काँग्रेसची जी पारंपारिक मतं आहेत ती बांदिवडेकरांपासून दूर जावीत हाही यामागे विरोधकांचा उद्देश होता असा आरोप बांदिवडेकरानी केला आहे..

30 मार्चला भरणार अर्ज
आपण ३० मार्च रोजी आपण आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं नविनचंद्र बांदिवडेकर यांनी आज स्पष्ट केलं..

बाईट-१- नवीनचंद्र बांदीवडेकर... आघाडी उमेदवार.. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघBody:माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे हे विरोधकांचं षडयंत्रच

नविनचंद्र बांदिवडेकर यांचा आरोप

शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमानला केलं लक्षConclusion:माझा सनातनशी संस्थेशी संबंध जोडणे हे विरोधकांचं षडयंत्रच

नविनचंद्र बांदिवडेकर यांचा आरोप

शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमानला केलं लक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.