रत्नागिरी - माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या Anil Parab Illegal Resort आहेत. कारण आता लवकरच वादग्रस्त साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार Anil Parab Sai Resort Demolish आहे. मुरुडमधील या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटी आणि जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची आज संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी Ratnagiri Collector on Sai Resort Demolish दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप करत तो असून तो पाडला जावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
रिसॉर्ट पाहण्याची कारवाई सुरू -आजच्या बैठकीबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल, हे रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने घालून दिलेल्या विहित नियमानुसार ही कारवाई होणार, असे जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी यावेळी सांगितले.