ETV Bharat / state

मंदिर विश्वस्त अन् पालखीधारकांना आता कोरोना चाचणी करणे बंधनकारक नाही

शिमगोत्सवासाठी मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांना कोरोना चाचणी करणे आता बंधनकारक नसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा सुधारित आदेश जारी केला आहे.

बातमी ड्राय असाईन करण्यात आली आहे
रत्नागिरी
author img

By

Published : Mar 22, 2021, 8:18 PM IST

रत्नागिरी - शिमगोत्सवासाठी मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांना कोरोना चाचणी करणे आता बंधनकारक नसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा सुधारित आदेश जारी केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 10 मार्च, 2021 रोजी दिलेल्या आदोशनुसार रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत्सव किंवा होळी उत्सव यासाठी आदेश निर्गमित केले होते. या आदेशामध्ये सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजन चाचणी करुन घ्यावी, असे नमूद करण्यात आले होते. आता 22 मार्च, 2021 च्या सुधारित आदेशानुसार या सूचनेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. पालखीसोबत असणाऱ्या मर्यादित स्थानिक लोकांनी कोरोनाचे प्राथमिक नियम पाळणे आवश्यक आहे व आरोग्य यंत्रणेकडून तापमापीने शरीराचे तापमान मोजणे व शरीरातील ऑक्सिजनची मर्यादेची तपासणी आवश्यक राहील.

जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या नागरिकांना चाचणी बंधनकारक

जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या नागरिकांनी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी आरटीपीसीआर किंवा रॅपीड अँटीजन चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील, असे सुधारित आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - "घरडा" केमिकल्स कारखाना स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करणार; राज्यमंत्री आदिती तटकरेंची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.