ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांसह अन्य शिवसेनेच्या नेत्यांनाही रिफायनरी प्रकल्प हवा आहे - माजी आमदार प्रमोद जठार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि स्थानिक नेत्यांना रिफायनरी प्रकल्प हवा आहे. त्यामुळे हा प्रकल्प राजापूरमध्येच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.

ratnagiri refinery project news
ratnagiri refinery project news
author img

By

Published : Aug 13, 2021, 8:33 PM IST

रत्नागिरी - शिवसेनेची अनेक नेते मंडळी तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार राजन साळवी यांना रिफायनरी प्रकल्प हवा आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील या प्रकल्पाच्या बाजूने आहे. त्यामुळे हा प्रकल्प राजापूरमध्येच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे वक्तव्य भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया

'प्रकल्प सर्वांनाच हवा आहे' -

हा प्रकल्प सर्वांनाच हवा आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, मनसे, शिवसेना आशा सर्वांनाच हा प्रकल्प हवा आहे. दरम्यान, कोयनेचे फुकट जाणारं पाणी कोकणात फिरवा, रिफायनरीच्या माध्यमातून हे पाणी कोकणात फिरवा आणि पाण्याचा बॅकलॉक दूर करा, असे जठार यावेळी म्हणाले.

'फक्त खासदार विनायक राऊत यांचे प्रबोधन बाकी आहे'-

दरम्यान, रिफायनरीची राजापूरमध्ये आवश्यकता आहे. फक्त खासदार विनायक राऊत यांचे प्रबोधन व्हायचे बाकी आहे. त्यांचे प्रबोधन बारसु एमआयडीसीच्या माध्यमातून झालेले असावे. पण परमेश्वराने खासदार विनायक राऊत यांना सुबुद्धी देवो आणि हा प्रकल्प होऊ दे, असा टोलाही जठार यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा - राज्यपाल बांधिल नाहीत, त्यांना निर्देश देऊ शकत नाही, 12 आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा -न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.