रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेच्या दुकानदारांना आता घरपोच सेवा किंवा सामान पुरवावं लागणार आहे. किराणा, भाजी, दूध नागरिकांना घरपोच दिले जाणार आहे. रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय अनेकांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे उद्यापासून मात्र याची अगदी कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
रत्नागिरीत मेडिकल वगळता सर्व दुकाने राहणार बंद; नागरिकांना आता घरपोच सेवा देण्याचे आदेश - रत्नागिरी कोरोना घडामोडी
गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाने मोठ्या संख्येने लोक बाहेर पडताना आढळत आहेत. ही बाब चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध आणि कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.