रत्नागिरी - जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांचे कर्मचारी, पुजारी व तेथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. पर्यटन तसेच मंदिरे उघडण्याला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का असेना कोरोनाकाळातील नियमांना पर्यटकांकडून हरताळ फासल्याचे देखील दिसून आले. या साऱ्या बाबींचा विचार करत जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांचे कर्मचारी आणि पुजारी तसेच तेथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
रत्नागिरी : देवस्थानांचे कर्मचारी व पुजाऱ्यांची होणार कोरोना चाचणी - ratnagiri temple news
कर्मचारी, पुजारी व तेथील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.