ETV Bharat / state

विकृतीचा कळस, दापोलीत 90 वर्षीय वृद्ध महिलेवर घरात घुसून अत्याचार

दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील एका गावामध्ये 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास 90 वर्षीय वृद्ध महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेउन एक अनोळखी माणूस घराच्या दरवाजातून आत आला. त्याने दरवाजा लावून घेत या वृद्ध महिलेवर अत्याचार केला.

90 year old woman victimized in Dapoli taluka
विकृतीचा कळस, दापोलीत 90 वर्षीय वृद्ध महिलेवर घरात घुसून अत्याचार
author img

By

Published : Jan 10, 2021, 12:02 AM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील एका गावामध्ये एका 90 वर्षीय वृद्धेवर भर दुपारी अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंबंधी दापोली पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

डिसेंबरमध्ये घडली घटना

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील एका गावामध्ये 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास 90 वर्षीय वृद्ध महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेउन एक अनोळखी माणूस घराच्या दरवाजातून आत आला. त्याने दरवाजा लावून घेत या वृद्ध महिलेवर अत्याचार केला. ही घटना घडली तेव्हा या वृद्धेची सून मुंबईला होती. तिला तिची सासू आजारी असल्याची माहिती शेजाऱ्यांनी मोबाईलवरुन कळवली. या वृद्धेची सून गावी परतल्यानंतर तिला हा प्रकार समजला. सूनेने सदर घटना गावातील प्रतिष्ठितांना सांगितल्यावर त्यांनी आपण वाडीची बैठक बोलावू असे सांगितले.

त्यानंतर या वृद्धेला खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले होते, तेथे त्यांना तपासून औषधे देण्यात आली. त्यानंतर वाडीची बैठक झाली. गावातील काही लोकांनी जवळच असलेल्या एका क्रशरवरील कर्मचाऱ्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून आणले होते. ते या वृद्धेला दाखविण्यात आले. या वृद्धेने अत्याचार केलेल्या व्यक्तीचा फोटोमध्ये ओळखले. या व्यक्तीची माहिती घेतली असता तो सोहन अमरचंद भिल, रा.सालेर , जि. चितोडगड, राजस्थान येथील असल्याचे समजले.

एकाला अटक

त्यानंतर शुक्रवार (ता .8) रोजी दापोली पोलीस ठाण्यात या वृद्धेच्या सूनेने संशयित सोहन भिल याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहन भिल याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - विशेष: ह्रदयद्रावक ठरलेल्या रुग्णालयातील आगीच्या काही दुर्घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.