रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या एसटी सेवाही ठप्प आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात एसटीला आतापर्यंत 7 लाख कोटी रूपयांचा तोटा झाल्याची माहिती परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. शिवाय, लॉकडाऊन संपेपर्यंत एसटीची सेवा सुरू होणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी एसटीची सुविधा सुरू असेल अशी माहितीही परब यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सध्या एसटीची अवस्था फार चांगली नसल्याचे परब यांनी म्हटले आहे. तर, राज्यातील टोल वसुलीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. मंगळवारच्या बैठकीत याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असेदेखील परब यांनी म्हटले आहे.