ETV Bharat / state

रत्नागिरीत कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी 22 कोरोनाबाधितांची नोंद - रत्नागिरी लेटेस्ट न्युज

मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली होती, तर बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये मंडणगडमधील 11, रत्नागिरीतील 7 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.

ratnagiri corona update  ratnagiri corona positive cases  रत्नागिरी कोरोना पॉझिटिव्ह केसेस  रत्नागिरी कोरोना अपडेट  रत्नागिरी लेटेस्ट न्युज  ratnagiri latest news
रत्नागिरीत कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी २२ कोरोनाबाधितांची नोंद
author img

By

Published : May 14, 2020, 8:01 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात बुधवारी रात्री एकाच वेळी 22 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 74 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 1 मेपर्यंत जिल्ह्यात एकूण 6 रुग्ण होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मे रोजी पुन्हा दोन कोरोना रुग्ण सापडले. त्या दिवसापासून ही संख्या वाढतच गेली. कधी 4, तर कधी 5, एके दिवशी 13 रुग्ण सापडले होते. यामध्ये आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. दरम्यान, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली होती, तर बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये मंडणगडमधील 11, रत्नागिरीतील 7 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील आणखी एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत नर्सिंगच्या एकूण 5 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे..

जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती -

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 74 वर पोहोचली आहे, तर अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण 66 झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या या 66 रुग्णांपैकी 5 रुग्ण सोडले, तर बाकी सर्व 61 रुग्णांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री मुंबई आहे. मुंबईकर कोरोनाचे वाहक ठरत असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, नाहीतर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.