रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रविवारी (दि. 28 जून) रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 580 वर पोहोचला आहे. दरम्यान, आतापर्यंत 430 जणांनी कोरोनावर मात केली असून 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, सध्याच्या घडीला दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा हा जिल्हावासियांकरीता चिंता वाढवणारा आहे.
2 नवजात बालकांना कोरोना
जिल्हा रुग्णालयातल्या प्रसूती विभागातील एका परिचारिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्या विभागातील मातांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये प्रसुती झालेल्या 6 मातांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे 6 नवजात बालकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी दोन बालकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर इतर बालकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच इतर स्टाफचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
हेही वाचा - पावसाअभावी भात शेती करपण्याची भीती; शेतकरी चिंतेत