रत्नागिरी - कोरोनाच्या या लढ्यात आता रत्नागिरीकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. दिल्लीतील मरकज येथे गेलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे 3 एप्रिलला स्पष्ट झाले होते. दरम्यान, या रूग्णाचे सध्या दोन्ही रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. या रूग्णावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी एक म्हणजेच तिसऱ्या रिपोर्टनंतर या रूग्णाला घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण राजीवडा परिसरात सापडला. 3 एप्रिलला या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान सध्या या रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
तर, सहा महिन्यांच्या बाळासह उर्वरित दोन कोरोनाबाधित रूग्णांच्या प्रकृतीत देखील सध्या सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. राजीवडा येथील 1 तर, साखरतर या गावातील तिघांना कोरेनाची लागण झाली आहे. यामध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे.