ETV Bharat / state

रत्नागिरीत 11 व 12 जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी - जिल्हाधिकारी - रत्नागिरी संचारबंदी

रत्नागिरी जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 12 जूननंतर देखील पावसाचा धोका कायम असेल. त्यामुळे या कालावधीत वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, ग्रामकृती दल व स्थानिक प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून एनडीआरएफच्या 2 टीम सुसज्ज ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी
author img

By

Published : Jun 8, 2021, 10:34 PM IST

रत्नागिरी - हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे 11 व 12 जून या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

याबाबत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, की रत्नागिरी जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 12 जूननंतर देखील पावसाचा धोका कायम असेल. त्यामुळे या कालावधीत वैद्यकीय कारणाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, ग्रामकृती दल व स्थानिक प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून एनडीआरएफच्या 2 टीम सुसज्ज ठेवण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिका आणि 31 गावे पूरग्रस्तत असतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच या भागातील नागरिक व ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. किनारी भागात हाय टाईड आणि पावसाचा धोका असल्याने किनारी भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर केले जाईल. पुराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना न बांधता ठेवणे, बोटी सुसज्ज ठेवणे, कुशल मनुष्यबळ तैनात ठेवणे, लाईफ बोया व इतर सामग्रीची तजवीज करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोविड सेंटरच्या ठिकाणी वीज खंडित झाल्यास जनरेटर पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ऑक्सिजन बफर साठा देखील ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती देखील लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा -Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.