ETV Bharat / state

तुराडे येथील तरुणाचा रेल्वेखाली चिरडून जागीच मृत्यू

तुराडे येथील मयुर मोरेश्वर महाडिक (वय 24 ) या तरुणाचा मंगळवार दिनांक 6 रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे पकडताना पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

youth-from-turade-was-found-under-a-train-and-died-on-the-spot
तुराडे येथील तरुणाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू
author img

By

Published : Apr 6, 2021, 7:35 PM IST

खालापूर/रायगड- तुराडे येथील मयुर मोरेश्वर महाडिक (वय 24 ) या तरुणाचा मंगळवार दिनांक 6 रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे पकडताना पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

पाय घसरल्याने रेल्वे खाली गेला मयुर-

याबाबत माहिती अशी की, रसायनी रेल्वे स्टेशन अप लाईनवर स्टोन क्रमांक ७९/२१/२३ च्या जवळ रोहा - पनवेल वर्कं मॅन स्पेशल ही चालू ट्रेन पकडताना मयुरचा पाय घसरून रेल्वेखाली गेला. यात रेल्वे अंगावरुन गेल्याने त्यामध्ये गंभीर दूखापत होऊन शरीराचे कमरेतून दोन तुकडे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मयुरच्या अपघाती मृत्यूने तराडे गावार शोककळा-

याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नरेश सत्यवान दुलन यांनी फिर्याद दाखल केली असून घटनास्थळी रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सहायक पोलीस निरीक्षक मुल्ला सर यांनी भेट दिली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात सिआरपीडी १७४ प्रमाणे नोंद झाली असून पोलीस म्हात्रे तपास करीत आहेत. मयुरच्या मृत्यूमुळे तुराडे गावावर शोककळा पसरली.

हेही वाचा- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार - गृहमंत्री वळसे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.