ETV Bharat / state

पेण तालुक्यातील युवकाचा स्तु्त्य उपक्रम; वाढदिवशी वाटले १०० हेल्मेट

author img

By

Published : Aug 2, 2019, 11:27 PM IST

पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त पेण प्रेस क्लब व वक्रतुंड मित्र मंडळ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई गोवा महामार्गावरील रेल्वे स्टेशन पोलीस चौकी समोर मोफत १०० हेल्मेटचे वाटप केले.

हेल्मेट

रायगड - हेल्मेट न घालता अनेकजण प्रवास करीत असतात. अशा वेळी अपघात झाला की डोक्याला मार लागून मृत्युमुखी होण्याचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे पेण प्रेस क्लब व वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १०० हेल्मेट मोटार सायकल स्वारास वाटले. त्यांच्या या अभिनव संकल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांच्या ३१व्या वाढदिवसानिमित्त मुंबई गोवा महामार्गावरील रेल्वे स्टेशन पोलीस चौकी समोर मोफत १०० हेल्मेटचे वाटप केले. यावेळी नितीन जाधव म्हणाले, की आज मोटारसायकलचा प्रवास हा फार जिकरीचा बनला आहे. त्यात महामार्गावर वाढलेल्या वाहनांमुळे तर फारच अडचणी येत आहेत. यात लहान वाहनांची संख्या देखील वाढत आहे. मात्र, आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट वापरणे हे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. त्यांनी कांबळे व पेण प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले.

जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी गेल्या काही वर्षात मोटारसायकलच्या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून हेल्मेट न वापरल्याने निरापराध लोकांचे जीव जात आहेत. विशेषतः महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. हे चित्र बदलले पाहिजे. यासाठी हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली. तसेच कांबळे यांना वयाच्या ३१ व्या वर्षी असे काही सुचल्याबद्दल त्यांच्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.

या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय मोकल, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, जेष्ठ पत्रकार वामन पाटील, समाजसेवक रवींद्र झिंजे, युवानेते विकास पाटील, उपसरपंच मंगेश पाटील आदींसह मंडळाचे सदस्य, पत्रकार व मोटरसायकलस्वार शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

Intro:
दत्ता कांबळे यांनी 100 हेल्मेटचे वाटप करून साजरा केला वाढदिवस

स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे - उपविभागीय अधिकारी नितीन जाधव

रायगड : रस्त्यावरून वा महामार्गावरून मोटार सायकल वरून जाताना हेल्मेट न घालता अनेकजण प्रवास करीत असतात. आशा वेळी अपघात झाला की डोक्याला मार लागून मृत्युमुखी होण्याचे प्रकार घडत असतात. हीच गोष्ट लक्षात ठेवून पेण प्रेस क्लब व वक्रतुंड मित्र मंडळ संस्थापक दत्ता कांबळे यांनी आपला वाढदिवस 100 हेल्मेट मोटार सायकल स्वारास देऊन साजरा केला. त्याच्या या अभिनव संकल्पनेचे सर्वांनी कौतुक केले आहे.

पेण येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे उर्फ डिके यांच्या 31 व्या वाढदिवसानिमित्त पेण प्रेस क्लब व वक्रतुंड मित्र मंडळ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई गोवा महामार्गावरील रेल्वे स्टेशन पोलीस चौकी समोर मोफत 100 हेल्मेटचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Body:या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, वक्रतुंड मित्र मंडळाचे संस्थापक दत्ता कांबळे, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय मोकल, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, जेष्ठ पञकार वामन पाटील, समाजसेवक रवींद्र झिंजे, युवानेते विकास पाटील, उपसरपंच मंगेश पाटील आदींसह मंडळाचे सदस्य, पञकार व मोटरसायकलस्वार शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नितीन जाधव म्हणाले की, आज मोटारसायकलचा प्रवास हा फार जिकरीचा बनला आहे. त्यात महामार्गावर वाढलेली वाहने यांमुळे तर फारच अडचणी येत आहेत. यात लहान वाहनांची संख्या देखिल वाढत आहे. मात्र आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्मेट वापरणे हे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. दत्ता कांबळे व पेण प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले. Conclusion:जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी गेल्या काही वर्षात मोटारसायकलच्या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून हेल्मेट न वापरल्याने निरापराध लोकांचे जीव जात आहेत. विशेषतः महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. हे चित्र बदलले पाहिजे. यासाठी हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली. तसेच दत्ता कांबळे यांना वयाच्या 31 व्या वर्षी असे सुचल्याबद्दल व या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते महामार्गावरुन प्रवास करणां-या शंभर मोटारसायकलस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे पेण तालुक्यात व जिल्हयात कौतुक केले जात आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलेश ठाकूर यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.