रायगड : खोटे व्हाटसऍप खाते बनवून शाळेतील मुलींना अश्लील व्हिडीओ पाठवणार्या एका तरुणाला तळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एक मुलीने तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे तळा शहरात पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियाचा वाढत आहे दुरुपयोग
इंटरनेटच्या माध्यमातून जगात हवी ती माहिती आणि व्हिडीओ मिळू लागल्याने जग हे बोटाच्या एका क्लिकवर जवळ आले आहे. फेसबूक, व्हाटसऍपचा वापर हा हल्ली वाढू लागला आहे. सोशल मीडिया हा फायद्याचा असला तरी तेवढाच तो घातकही होऊ लागला आहे. त्यामुळे काही विकृतांकडून या सोशल मिडियाचा दुरुपयोग होतानाही समोर येत आहे. असाच एक प्रकार हा तळा शहरात घडला आहे. तळा शहरातील शाळकरी मुलींना अज्ञात नंबरवरुन व्हॉटसऍपवर अश्लिल व्हिडीओ क्लिप पाठविण्यात येत होत्या. वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळे एका मुलीने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी 6 मार्च रोजी तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी ठोकल्या तरुणाला बेड्या
मुलीच्या तक्रारीवरून पोलीस अज्ञात इसमाच्या शोधात होते. व्हॉटसऍपद्वारे क्लिप पाठवलेली असली तरी ती पाठवताना कुठलेही सिमकार्ड वापरले नव्हते. त्यामुळे अज्ञाताचा शोध घेण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी येत होत्या. मोबाईलचे लोकेशन तळेगाव आणि तळा बाजारपेठ बळीचा नाका असे दिसत होते. याच लोकेशनचा आधार घेत रविवारी रात्री पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
एका मुलीने केली तक्रार
पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे तळा बाजारपेठेत मोबाईल दुरुस्ती तसेच मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. त्यामुळे दुरुस्ती आणि रिचार्जला आलेल्या मुलींचे मोबाईल नंबर त्याला सहज मिळत होते. याचा गैरफायदा घेऊन तो मुलींना हेरून त्यांना अश्लील व्हिडीओ पाठवत असे. अश्लील व्हिडीओ पाठविण्यासाठी त्याने व्हाटसऍपवर खोटे खाते तयार केले होते. त्यावर डीपी म्हणून मुलीचा फोटो ठेवला होता. वारंवार मुलींना अश्लिल व्हिडीओ येत असल्याने एका मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला.
यांनी केली कारवाई
याबाबत तळा पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास तळा पोलीस निरीक्षक गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खराडे, पोलीस हवालदार सरणेकर, पोलीस हवालदार पवार आणि गोपनीय कमकाज पाहणारे पोलीस शिपाई विष्णू तिडके करीत आहेत.
शाळकरी मुलींना अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्या तरुणाला अटक - raigad tala
मुलीने तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे तळा शहरात पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
![शाळकरी मुलींना अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्या तरुणाला अटक शाळकरी मुलींना अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्या तरुणाला अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11034764-thumbnail-3x2-raigd.jpg?imwidth=3840)