ETV Bharat / state

विशेष : अलिबाग शहरात आता दिसणार 'महिला' रिक्षा चालक; नगरपालिकेची संकल्पना

author img

By

Published : Mar 8, 2021, 5:38 PM IST

Updated : Mar 8, 2021, 7:11 PM IST

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अबोली योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण विभागातर्फे रिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. शिक्षित महिलांना रिक्षा खरेदीसाठी आरडीसीसी बँकेमार्फत कर्ज देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्षा अ‌ॅड. मानसी म्हात्रे यांनी दिली.

women will drive autorikshaw in alibag
अलिबाग शहरात आता दिसणार महिला रिक्षा चालक

रायगड - रिक्षा चालविताना आपल्याला नेहमीच पुरुष रिक्षाचालक दिसतात. मात्र, आता अलिबागमध्ये महिलाही रिक्षा चालकाच्या भूमिकेत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अलिबाग शहरातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि त्याचे सबलीकरण करण्यासाठी नगरपरिषदेने पावले उचलली आहेत.

याबाबतच्या प्रतिक्रिया.

अबोली योजनेंतर्गत कार्यक्रम -

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अबोली योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण विभागातर्फे रिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. शिक्षित महिलांना रिक्षा खरेदीसाठी आरडीसीसी बँकेमार्फत कर्ज देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्षा अ‌ॅड. मानसी म्हात्रे यांनी दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने नगरपरिषदेने महिला सबलीकरणासाठी पुढाकार घेतला असल्याचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिसून येत आहे.

अलिबाग नगरपरिषदेचा पहिला क्रमांक -

अलिबागला नुकताच पर्यटनाचा ब दर्जा शासनाने दिला आहे. अलिबागमध्ये पर्यटनास लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. शहरात आणि बाजूच्या परिसरात पर्यटनास फिरण्यास शहरात रिक्षाची सुविधा आहे. सध्या शहरात पुरुष हेच रिक्षा चालवत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे वा इतर शहरात महिलाही रिक्षा चालवित आहेत. मात्र, जिल्ह्यात महिला रिक्षाचालक नाहीत. त्यादृष्टीने अलिबाग नगरपरिषद जिल्ह्यात पहिलीच नगरपरिषद महिलांना रिक्षा चालविण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

हेही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१-२२ : पर्यावरण आणि पर्यटनासाठी मोठी तरतूद

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहरातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील दहाहून अधिक महिलांना रिक्षा चालविण्याचे मोफत प्रशिक्षण तसेच लायसन्स, बॅच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज स्नेहा कांदु, रुपाली थळे, पूजा राऊत या महिलांनी पुढे येऊन रिक्षा चालविण्याचा मानस केला आहे. नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाकडून या महिलांना साई मोटर्सतर्फे रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षित झालेल्या महिलांना रिक्षा खरेदीसाठी आरडीसीसी बँकेमार्फत कर्ज पुरवठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

अलिबागेतही दिसणार आता महिला रिक्षा चालक -

आजच्या काळात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. अनेक महिला दुचाकी, चारचाकी चालवीत आहेत. आपल्या कुटुंबाला हातभार व्हावा, यादृष्टीने अलिबाग मधील महिला ह्या रिक्षा शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लवकरच अलिबाग शहरात महिला रिक्षाचालक प्रवाशांना सुविधा देताना दिसणार आहेत.

हेही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१ : रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

Last Updated : Mar 8, 2021, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.