ETV Bharat / state

कौतुकास्पद! रेल्वे रुळावर बेशुद्ध पडलेल्या महिलेचे पोलिसांनी पायपीट करत वाचविले प्राण - रायगड पोलीस

पळसदरी स्टेशनवर पोहचल्यानंतर पुढे घाट असून वाहनांला जाण्याचा रस्ता नव्हता. म्हणून चालकाने खोपोली कर्जत मार्गावरील केळवली स्टेशन गाठले. केळवली येथे गाडी ठेवून हे पथक डोंगर भाग पायपीट करत रेल्वे मार्गावर पोहचले. तेथून पुढे चार किलोमीटर लोणावळा दिशेने चालत गेल्यानंतर बेशुध्दवस्थेत पडलेली महिला दिसली.  कोरोनामुळे रेल्वे मार्गावरील अनेक मेल एक्स्प्रेस रद्द झाल्या असल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी जखमी वाघमारे यांना झोळी तयार करून त्यांना डोंगर भागातून केळवली येथे आणले. त्यानंतर गाडीतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

महिलेचे पोलिसांनी पायपीट करत वाचविले प्राण

author img

By

Published : Jun 2, 2021, 5:23 PM IST

Updated : Jun 2, 2021, 5:39 PM IST

रायगड - वांगणी येथील रेल्वेस्टेशनवरील रुळावर पडलेल्या मुलाला धावत्या ट्रेन समोर जाऊन मयूर शेळके याने मुलाचे प्राण वाचविले होते. ही घटना ताजी असतानाच कर्जत रेल्वे पोलिसांनी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर एका महिलेचे प्राण वाचविले आहे. पळसदरी खंडाळा दरम्यान रुळाच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या महिलेला चार किलोमीटर डोंगर भागातून चालत खांद्यावर घेवून रुग्णालयात दाखल करत तिचे प्राण वाचविले आहेत. आशाताई वाघमारे (42 रा. कार्ला - इरगाव, तालुका मावळ, पुणे) असे या महिलेचे नाव आहे.

महिला रेल्वे रुळावर पडली बेशुद्ध

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला इरगाव येथील आशाताई वाघमारे या 31 मे रोजी लाकडे गोळा करण्यासाठी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील खंडाळा रेल्वेमार्गाच्या परिसरात असलेल्या जंगलात गेल्या होती. यावेळी रेल्वे मार्गातून येत असताना वाघमारे यांना चक्कर येऊन त्या रुळाच्या बाजूला कोसळून बेशुद्ध पडल्या. कर्जत रेल्वे पोलिसांना कंट्रोल रूममधून एक महिला पळसदरी खंडाळा या घाटातील रेल्वे मार्गाच्या बाजूला बेशुद्धावस्थेत पडली असून ती जखमी असल्याचा संदेश मिळाला होता.

महिलेचे पोलिसांनी पायपीट करत वाचविले प्राण
अन् पोलिसांनी केली पायपीट

कर्जत रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच कर्जत रेल्वे पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे, उपनिरीक्षक सरकाळे, रिजर्व पोलीस, जी आर पी, होमगार्ड पथकासह घटनास्थळी रवाना झाले. पळसदरी स्टेशनवर पोहचल्यानंतर पुढे घाट असून वाहनांला जाण्याचा रस्ता नव्हता. म्हणून चालकाने खोपोली कर्जत मार्गावरील केळवली स्टेशन गाठले. केळवली येथे गाडी ठेवून हे पथक डोंगर भाग पायपीट करत रेल्वे मार्गावर पोहचले. तेथून पुढे चार किलोमीटर लोणावळा दिशेने चालत गेल्यानंतर बेशुध्दवस्थेत पडलेली महिला दिसली. कोरोनामुळे रेल्वे मार्गावरील अनेक मेल एक्स्प्रेस रद्द झाल्या असल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी जखमी वाघमारे यांना झोळी तयार करून त्यांना डोंगर भागातून केळवली येथे आणले. त्यानंतर गाडीतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीमुळे आशाताई वाघमारे यांना पुन्हा नवे जीवन मिळाले आहे.

यांनी वाचविले महिलेचे प्राण

पोलीस उपनिरीक्षक टी एन सरकाळे, पोलीस शिपाई निकेश तुरडे, मंगेश गायकवाड, पोलीस नाईक ज्ञानेश्वर गांगुर्डे, कोंडीराम बनसोडे, होमगार्ड वि डी लोभी यांनी तत्परता दाखवून महिलेचे प्राण वाचविण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे.

हेही वाचा-special friendship - नागपुरातील अनन्याने साधली कोकिळेशी खास मैत्री

Last Updated : Jun 2, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.