ETV Bharat / state

पनवेलच्या हॉटेल 'वीर पार्क'मध्ये आढळला पती-पत्नीचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? - WIFE HUSBAND

पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केली असावी, मात्र या पाठीमागचे नेमके कारण काय असावे, हे समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता. त्यातूनच हे प्रकरण घडले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

पनवेल
author img

By

Published : Jun 6, 2019, 12:23 PM IST

रायगड - सुकापूर येथे असलेल्या 'वीर पार्क' हॅाटेलमध्ये पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. पत्नीसोबतच्या भांडणाचे पर्यवसन या अघोरी प्रकारात झाले असून आधी पत्नीचा खून करून नंतर पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही हत्या आहे, की आत्महत्या याचा उलगडा अजून झालेला नाही.

सुकापूर भागतवाडी जवळच्या हॉटेल वीर पार्कमध्ये या दोघांनी राहण्यासाठी रूम घेतली होती. रात्री जेवण करून दोघे जण रूमवर आले. बुधवारी ते रूम सोडणार होते. हे दोघेही सकाळपासून रूममध्येच होते. मात्र, रूममध्ये गेल्यापासून दोघांचा हॉटेलमधील कर्मचार्‍यांशी कोणताही संपर्क नव्हता आणि ते बाहेरसुद्धा आले नाहीत. रात्री 8 च्या सुमारास हॉटेलमधील कर्मचार्‍यांना या दोघांच्या बाबतीत संशय आला.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दरवाजाची बेल वाजवली आणि जोरजोरात दार वाजवले, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहून कर्मचाऱ्यांनी खिडकीतून रूममध्ये प्रवेश करून पाहिले असता रूममध्ये दोघांचा मृतदेह आढळून आले. त्यानंतर लगेच हॉटेल मालकाने खान्देश्वर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या दोघांनी ही रूम घेताना जे ओळखपत्र आणि पत्ता दिला होता, त्यानुसार पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे. लवकरच या घटनेचे गूढ उकलेल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केली असावी, मात्र या पाठीमागचे नेमके कारण काय असावे, हे समजू शकले नाही. प्राथमिक माहितीनुसार, या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू होता. त्यातूनच हे प्रकरण घडले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरू केले होते.

Intro:बातमीला फाईल फोटो वापरणे

पनवेल

पनवेलमधल्या सुकापूर इथे असलेल्या वीर पार्क या हॊटेलमध्ये एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय. पत्नीसोबत भांडणाचे पर्यवसान या अघोरी प्रकारात झाले असून आधी पत्नीचा खून करून मग स्वतः पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

Body:सुकापूर भागतवाडी जवळच्या हॉटेल वीर पार्कमध्ये त्यांनी राहण्यासाठी खोली घेतली होती. रात्री जेवण करून दोघे जण रूमवर आले. काल ते रूम सोडणार होते. हे दोघेही सकाळपासून रूममध्ये होते. मात्र रूममध्ये गेल्यापासून दोघांचा हॉटेलमधील कर्मचार्‍यांशी कोणताही संपर्क नव्हता आणि ते बाहेर सुुध्दा आले नाहीत. रात्री 8 च्या सुमारास हॉटेलमधील कर्मचार्‍यांना या दोघांच्या बाबतीत संशय आला.
त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी दरवाजाची बेल वाजवली आणि जोरजोरात दार वाजवला. पण त्याही वेळेला आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांनी खिडकीतून रूममध्ये प्रवेश करून पाहिले असता रूममध्ये दोघांचा मृतदेह होते. त्यानंतर लागलीच हॉटेल मालकाने खान्देश्वर पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. या दोघांनी ही रूम घेताना जे ओळखपत्र आणि पत्ता दिला होता, त्यानुसार पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे. लवकरच या घटनेचे गूढ उकलेल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय.Conclusion:पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केली असावी. मात्र ही हत्या आणि आत्महत्येच्या पाठीमागे नेमके काय कारण असावे, हे समजू शकले नाही. तिथे उपलब्ध झालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुरबुरी सुरू होत्या. त्यातूनच हे प्रकरण इथपर्यंत गेले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करण्याचे काम सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे कामकाज सुरू होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.