ETV Bharat / state

रायगडला मंत्रिपदाची लॉटरी लागेल का? रायगडकरांमध्ये चर्चा

कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ लवकरच महाविकास आघाडीमधून दिली जाणार आहे. यात रायगडमधून पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, कोणाला संधी मिळून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाईल की, बाहेरचा पालकमंत्री लादला जाईल, याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

raigad
रायगडचे पालकमंत्री पद कोणाला
author img

By

Published : Nov 29, 2019, 2:14 PM IST

रायगड - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. तर, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाच्या प्रत्येकी २ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. इतर कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ लवकरच महाविकास आघाडीकडून होणार आहे. त्यामुळे रायगडमधून कोणाला संधी मिळून पालकमंत्री पदाची धुरा दिली जाईल, की पुन्हा जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री लादला जाईल, याकडे आता रायगडकरांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांना संधी मिळेल, अशी चर्चा असली तरी गोगावले यांना मंत्रिपद मिळेल की नाही? हे पक्ष नेतृत्वावर ठरणार आहे.

रायगडचे पालकमंत्री पद कोणाला

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे महाडमधून भरत गोगावले, अलिबाग महेंद्र दळवी आणि कर्जत महेंद्र थोरवे हे ३ आमदार निवडून आले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे ह्या एकमेव निवडून आल्या आहेत. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि अदिती तटकरे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेले आहेत तर, भरत गोगावले यांची ही तिसरी टर्म आहे. त्यामुळे भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, २ जखमी

राष्ट्रवादीचे सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे हे सुद्धा मुलगी अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अदिती यांनाही राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळू शकते. मात्र, तटकरे कुटुंबात खासदार आणि २ आमदार अशी पदे राष्ट्रवादीकडून दिली आहेत. तर, मंत्रिपदासाठी भाऊगर्दी असल्याने अदिती तटकरे यांना पहिल्याच टर्ममध्ये संधी मिळेल असे दिसत नाही.

शिवसेनेमध्येही मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने भरत गोगावले यांना पक्षाकडून संधी मिळेल की, नाही यात शंका आहे. मात्र, आगामी राजकीय परिस्थितीनुसार जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे रायगडाला मंत्रिपदाची संधी मिळणे गरजेचे आहे. मात्र, तूर्तास तरी रायगडला मंत्रिपद मिळेल की नाही, याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार आल्याने पनवेलमध्ये शेकापचा जल्लोष

Intro:
रायगडला मंत्रिपदाची लॉटरी लागेल का ?

रायगडकरामध्ये चर्चा

शिवसेनेचे भरत गोगावले तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अदिती तटकरे यांची चर्चा

रायगड : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाच्या प्रत्येकी दोन जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. इतर कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ लवकरच महा विकास आघाडीमधून होणार आहेत. त्यामुळे रायगड मधून कोणाला संधी मिळून पालकमंत्री पदाची धुरा दिली जाईल की पुन्हा जिल्ह्याला बाहेरचा पालकमंत्री लादला जाईल याबाबत आता रायगडकरांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांना संधी मिळेल अशी चर्चा असली तरी गोगावले यांना मंत्रिपद मिळेल की नाही हे पक्ष नेतृत्वावर ठरणार आहे.

Body:रायगड जिल्ह्यात महा विकास आघाडीचे शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून आला आहे. शिवसेनेचे महाड भरत गोगावले, अलिबाग महेंद्र दळवी आणि कर्जत महेंद्र थोरवे हे तीन आमदार निवडून आले आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे ह्या एकमेव निवडून आल्या आहेत. महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि अदिती तटकरे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून विधानसभेवर गेले आहेत. भरत गोगावले याची ही तिसरी टर्म आहे. त्यामुळे भरत गोगावले यांना मंत्रिपदाची शक्यता आहे.
.Conclusion:
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे हे सुद्धा आपली कन्या अदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अदिती तटकरे यांना ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपद मिळू शकते. मात्र तटकरे कुटूंबात खासदार आणि दोन आमदार अशी पदे राष्ट्रवादी कडून दिली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी भाऊगर्दी असल्याने अदिती तटकरे यांना पहिल्याच टर्म मध्ये संधी मिळेल असे दिसत नाही.

शिवसेनेमध्येही मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने भरत गोगावले याना पक्षाकडून संधी मिळेल की नाही यात शंका आहे. मात्र आगामी राजकीय परिस्थितीनुसार जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढलेले आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे रायगडाला मंत्रिपदाची संधी मिळणे गरजेचे आहे. मात्र तूर्तास तरी रायगडला मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत चर्चा सुरू झालेली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.