ETV Bharat / state

रायगड लोकसभा मतदारसंघ : २०१४ च्या तुलनेत मतदार वाढले; मतदानाचा टक्का मात्र घसरला - lok sabha

रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अनंत गीते व महाआघाडीचे सुनील तटकरे यांच्यात ही लढत रंगतदार झालेली आहे. उमेदवारांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून प्रचारात धुरळा उडवला होता.

रायगड लोकसभा निवडणुकीत मताचा टक्का घसरला
author img

By

Published : Apr 25, 2019, 2:14 PM IST

रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, २०१४ व २०१९ ची तुलना करता, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ८०० ते १२ हजाराने मते वाढलेली आहेत. मात्र, गुहागर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये १४५९ मतांची घट झालेली आहे. त्यामुळे ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार हे २३ मेच्या मतमोजणीवेळी स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्यातरी गीते की तटकरे विजयी होणार याबाबत चर्चा रंगलेली आहे.

रायगड लोकसभा निवडणुकीत मताचा टक्का घसरला

रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अनंत गीते व महाआघाडीचे सुनील तटकरे यांच्यात ही लढत रंगतदार झालेली आहे. उमेदवारांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून प्रचारात धुरळा उडवला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १५ लाख २९ हजार २८ एवढे मतदार होते. यापैकी ९ लाख ८८ हजार १८२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. २०१४ ला एकूण ६४.६० टक्के मतदान लोकसभा मतदारसंघात झाले होते.

१७ व्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार होते. २०१४ च्या तुलनेत १ लाख मतदार वाढले होते. यापैकी १० लाख २० हजार १८५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ६१.७७ टक्के मतदान जिल्ह्यात पार पडले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पेणमध्ये १२ हजार ७८०, अलिबाग ४ हजार ६५७, श्रीवर्धन ८७७, महाड ६ हजार ११३ तर दापोली ९ हजार ४६५ एवढे मताधिक्य वाढलेले आहे. तर गुहागरमध्ये १४५९ मतांची घट झालेली आहे.

पेण, अलिबाग, महाड, दापोली या मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतांमध्ये वाढ झालेली आहे. तर श्रीवर्धन मध्ये फक्त ८७७ मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदारसंघातून कोणाला मताधिक्य मिळणार यावर उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे. अनंत गीते व सुनील तटकरे या दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये टक्कर असली तरी वंचित बहुजन आघाडी, बसपा, दोन अपक्ष सुनील तटकरे, अपक्ष उमेदवार हे सुद्धा मते मिळविणार आहेत. त्यामुळे तटकरे व गीते यांची मते विभागली जाणार आहेत.

२०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असून शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही मतदार राजा हा बाहेर पडला नाही. तर वाढलेली मते काही प्रमाणात मतपेटीत पडली असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहेत.

२०१४ ला झालेले मतदान -

मतदारसंघ - मतदार - झालेले मतदान - टक्केवारी
पेण - २७७९०६ - १८२७८७ - ६५.७७
अलिबाग - २७२६३२ - १८५१०१ - ६७.८९
श्रीवर्धन - २३६४०१ - १५१७७७ - ६४.२०
महाड - २६१८९८ - १६२४६७ - ६२.०३
दापोली - २५७६९७ - १६२४४२ - ६३.०४
गुहागर - २२३१९४ - १४३१६८ - ६४.१५

पोस्टल - ४१०

एकूण - १५२९७२८ - ९८८१८२ - ६४.६०

२०१९ झालेले मतदान -

मतदारसंघ - मतदार - झालेले मतदान - टक्केवारी
पेण - ३०००७६ - १९५५६७ - ६५.१७
अलिबाग- २९२४२१ - १८९७५८ - ६४.८९
श्रीवर्धन - २५६१८० - १५२६६४ - ५९.५९
महाड - २८४२३० - १६८५८० - ५९.३१
दापोली - २७९२३८ - १७१९०७ - ६१.५६
गुहागर - २३९४१५ - १४१७०९ - ५९.१९

एकूण - १६५१५६० - १०२०१८५ - ६१.७७

Intro:
रायगड लोकसभा निवडणुकीत मताचा टक्का घसरला

मात्र पाच विधानसभा मतदारसंघात मते वाढली तर गुहागरमध्ये 1400 मताने झाली घट

रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 2014 च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र 2014 व 2019 ची तुलना करता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आठशे ते बारा हजाराने मते वाढलेली आहेत. मात्र गुहागर मतदार संघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 1459 मताची घट झालेली आहे. त्यामुळे ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार हे 23 मे च्या मतमोजणीवेळी स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी गीते की तटकरे विजयी होणार ही चर्चा रंगलेली आहे.

रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अनंत गीते व महाआघाडीचे सुनील तटकरे यांच्यात ही लढत रंगतदार झालेली आहे. उमेदवारांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून प्रचारात धुरळा उडवला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 15 लाख 29 हजार 28 एवढे मतदार होते. यापैकी 9 लाख 88 हजार 182 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 ला एकूण 64.60 टक्के मतदान लोकसभा मतदारसंघात झाले होते. Body:17 व्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात 16 लाख 51 हजार 560 मतदार होते. 2014 च्या तुलनेत एक लाख मतदार वाढले होते. यापैकी 10 लाख 20 हजार 185 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी 61.77 टक्के मतदान जिल्ह्यात पार पडले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पेणमध्ये 12 हजार 780, अलिबाग 4 हजार 657, श्रीवर्धन 877, महाड 6 हजार 113 तर दापोली 9 हजार 465 एवढे मताधिक्य वाढलेले आहे. तर गुहागरमध्ये 1459 मताची घट झालेली आहे.

पेण, अलिबाग, महाड, दापोली या मतदार संघात 2014 च्या तुलनेत मतांमध्ये वाढ झालेली आहे. तर श्रीवर्धन मध्ये फक्त 877 मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदारसंघातून कोणाला मताधिक्य मिळणार यावर उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे. अनंत गीते व सुनील तटकरे या दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये टक्कर असली तरी वंचित बहुजन आघाडी, बसपा, दोन अपक्ष सुनील तटकरे, अपक्ष उमेदवार हे सुद्धा मते मिळविणार आहेत. त्यामुळे तटकरे व गीते यांची मते विभागली जाणार आहेत.

2019 मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असून शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही मतदार राजा हा बाहेर पडला नाही. तर वाढलेली मते काही प्रमाणात मतपेटीत पडली असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहेत.
Conclusion:*2014 ला झालेले मतदान*

मतदार झालेले मतदान टक्केवारी
पेण 277906 182787 65.77
अलिबाग 272632 185101 67.89
श्रीवर्धन 236401 151777 64.20
महाड 261898 162467 62.03
दापोली 257697 162442 63.04
गुहागर 223194 143168 64.15

पोस्टल 410
-------------------------------------------------------------
एकूण 1529728 988182 64.60

------------------------------------------------------------
*2019 झालेले मतदान*

मतदार झालेले मतदान टक्केवारी

पेण 300076 195567 65.17

अलिबाग 292421 189758 64.89

श्रीवर्धन 256180 152664 59.59

महाड 284230 168580 59.31

दापोली 279238 171907 61.56

गुहागर 239415 141709 59.19
----------–-----------------------------------------------
एकूण 1651560 1020185 61.77
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.