रायगड - विधानसभा निवडणूक निकालामध्ये रायगड जिल्ह्यात मतदारांनी शिवसेनेला सर्वाधिक 4 लाख 37 हजार 719 मते देऊन पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. शेकापला 3 लाख 15 हजार 331 मते पडली आहेत, तर भाजपला दोन मतदारसंघात निवडणूक लढवून 2 लाख 91 हजार 489 मते पडली आहेत. यामुळे एकही जागा न जिंकणारा शेतकरी कामगार पक्ष नंबर दोनचा पक्ष ठरला आहे.
जिल्ह्यात पक्षांना मिळालेली मते
- शिवसेना - 4 लाख 37 हजार 719
- शेतकरी कामगार पक्ष - 3 लाख 15 हजार 331
- भाजप - 2 लाख 91 हजार 489
- राष्ट्रवादी काँग्रेस - 1 लाख 76 हजार 236
- काँग्रेस - 85 हजार 554
- अपक्ष - 1 लाख 25 हजार 915
- नोटा - 29 हजार 188
- बसपा- 9 हजार 589
- मनसे - 8 हजार 807
- वंचित - 9 हजार 691
जिल्ह्यात अलिबाग, महाड, श्रीवर्धन, कर्जत आणि उरण या पाच मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे होते. पेण आणि पनवेल या दोन मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उभे होते. शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी असताना श्रीवर्धन आणि महाड या ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे करण्यात आले होते. तर अलिबाग, पेण याठिकाणी आघाडी असताना काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली होती.
हेही वाचा... कायर चक्रीवादळ रायगडच्या किनारपट्टीवर धडकणार? नांगर टाकून हजारो बोटी किनाऱ्यावर विसावल्या
विधानसभा निकालात जिल्ह्यात अलिबाग, महाड, कर्जत याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. उरण आणि श्रीवर्धन याठिकाणी शिवसेनेला अपयश आले. या पाचही विधानसभा मतदातसंघात शिवसेनेला सर्वाधिक 4 लाख 37 हजार 719 मते पडली असून जिल्ह्यात सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना ठरला आहे. पेण आणि पनवेल या दोन ठिकाणी भाजपने निवडणूक लढवली असून दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही मतदारसंघात मिळून भाजपाला 2 लाख 91 हजार 489 एवढी मते पडली आहेत.
हेही वाचा... अलिबागमध्ये मराठा आरमार दिवस साजरा, कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीस्थळी पूजन
शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. या चारही ठिकाणी शेकापला पराभव पत्करावा लागला. चार विधानसभा मतदारसंघात शेकापला 3 लाख 15 हजार 331 मते पडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीवर्धन आणि कर्जत याठिकाणी उमेदवार उभे केले होते. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीला यश आले असून कर्जतमध्ये पराभव झाला आहे. राष्ट्रवादीला दोन्ही मतदारसंघात 1 लाख 76 हजार 236 मते पडली आहेत.
हेही वाचा... क्यार चक्रीवादळाचा श्रीवर्धनच्या किनारपट्टीला फटका
काँग्रेसने आघाडी मार्फत महाड, पेण, अलिबाग येथे मैत्रीपूर्ण लढत केली होती. काँग्रेसचा तिन्ही ठिकाणी पराभव झाला असून एकूण 85 हजार 554 मते पडली आहेत. जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांना 1 लाख 25 हजार 915 मते पडली असली तरी काँग्रेस पेक्षा जास्त मते पडली आहेत. 29 हजार 188 नोटला मते पडली आहेत. बसपने पाच मतदारसंघात उमेदवार उभे केले असून 9 हजार 589 मते पक्षाला पडली आहेत. मनसेने तीन ठिकाणी उमेदवार उभे केले असून 8 हजार 807 मते पडली आहेत. वंचित बहुजन आघाडीने तीन उमेदवार दिले असून 9 हजार 691 मते पक्षाला पडली आहेत. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असूनही तीनही पक्षांना या निवडणुकीत चांगलाच फटका पडला असून मतांमध्येही घसरण झाली आहे.