रायगड - श्रीवर्धन मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्रालयाला आग लागली नव्हती, तर ती आग माजी मंत्री सुनिल तटकरेंनी लावली होती, असा गंभीर आरोप शिवसेनेचे उपनेते तथा श्रीवर्धन मतदारसंघातीत उमेदवार विनोद घोसाळकर यांनी म्हसळा येथे केला आहे.
घोसाळकर हे सोमवारी म्हसळ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख आप्पा विचारे, बाळ करडे, तालुकाप्रमुख महादेव पाटील, माजी तालुकाप्रमुख नंदू शिर्के, विभागप्रमुख हेमंत नाक्ती, सरपंच अनंत नाक्ती, माजी सरपंच पांडूरंग बने, शहरप्रमुख मुन्नाभाई पानसरे, युवा सेना अधिकारी अमित महामुणकर, महिला अध्यक्षा रिमा महामुणकर यांच्यासहीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - 'पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करा, शेवटपर्यंत जनतेसाठीच काम करणार'
तालुक्यातील कांदळवाडा येथे झालेल्या सभेत घोसाळकर यांनी खा. सुनिल तटकरे यांच्यावर टीका करीत यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल मंत्रालयात होत्या, म्हणून सुनिल तटकरेंनी मंत्रालयाला आग लावली, असा आरोप केला. कांदळवाडा हे गाव कट्टर शिवसैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. म्हणून या गावात कोणीही निधी देत नाही. म्हणून या गावाचा विकास रखडला असल्याचा अप्रत्यक्ष टोला माजी सरपंच पांडूरंग बने यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना लगावला.
हेही वाचा - दसरा मेळावा! शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का?