ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात पावसाची रिपरिप; आंबा, पांढरा कांदा पीक धोक्यात - रायगड अवकाळी पाऊस न्यूज

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडत आहे. पहाटे पाऊस आणि दुपारी ऊन या ऋतुचक्राच्या खेळामुळे कांदा आणि आंबा पिकावर परिणाम होत आहे.

unseasonal-rains-in-raigad
unseasonal-rains-in-raigad
author img

By

Published : Dec 14, 2020, 10:32 AM IST

रायगड - जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. ऐन थंडीत पावसाचे आगमन झाले असल्याने गारव्यात आणखीनच वाढ झाली आहे. रायगडसह कोकण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अवकाळी पावसाचा आंबा, कांदा उत्पादनावर परिणाम

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस पडत आहे. पहाटे पाऊस आणि दुपारी ऊन या ऋतुचक्राच्या खेळामुळे कांदा आणि आंबा पिकावर परिणाम होत आहे. अवेळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे. सध्या आंब्याच्या झाडाला मोहर आला असून अवकाळी पावसामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. तर दुसरीकडे अलिबाग तालुक्यात पांढऱ्या कांद्याच्या लागवडीस सुरुवात झाली आहे. मात्र, पावसाचे पाणी जमिनीत मुरुन कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाची रिपरिप

रायगडसह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता-

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने रायगडसह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत नसला तरी दोन-तीन तास रिमझिम सुरु आहे.

हेही वाचा- मराठा मोर्चा; आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोस्त तैनात

हेही वाचा- शैवाल वनस्पतींपासून अन्न, औषध आणि शेतीत वापरण्यायोग्य उत्पादने बनवण्याचे लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.