ETV Bharat / state

रायगड : तळवली गावाजवळ सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह - dead body find out in karjat

खोपोली रोड येथील काजुचा माळ, तळवली गावाजवळ रस्त्यालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (दि. 11 ) सापडला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 13, 2021, 6:23 AM IST

कर्जत ( रायगड ) - खोपोली रोड येथील काजुचा माळ, तळवली गावाजवळ रस्त्यालगत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (दि. 11 ) सापडला आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर होत घटनेचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप समजू शकले नाही.

कर्जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह पुरुष जातीचे असून, वय अंदाजे 25-30 वर्षाचे असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतदेहाच्या डोक्याजवळील भाग कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेह तीनपेक्षा अधिक दिवसांपासून अधिक काळ मृतदेह पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृतदेहाचे दात मोठ्या आकाराचे असून डाव्या हाताच्या अनामिका बोटाला बँडेज दिसत आहे. याबाबत कोणाकडे माहिती असल्यास कर्जत पोलिसांना माहिती द्यावी, त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा - माथेरानमध्ये महिलेचा शिर कापलेला मृतदेह आढळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.