ETV Bharat / state

ब्रेक फेल होऊन तेलाचे टँकर पलटी; अपघातात दोन जण ठार, तीन जखमी - Pune

तेलाच्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोन ट्रक आणि एका पीकअप व्हॅनला टँकरची धडक बसल्याने दोन जण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत.

Khopoli
अपघातात चक्काचूर झालेला टँकर
author img

By

Published : May 16, 2020, 5:30 PM IST

रायगड - पुण्यावरुन मुंबईकडे जाणारा तेलाच्या टँकरचा ब्रेक फेल झाल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोन ट्रक आणि एका पीकअप व्हॅनला टँकरची धडक बसल्याने दोन जण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत. खोपोली शिळफाटा येथील पटेलनगर येथे हा अपघात झाला आहे.

ब्रेक फेल होऊन तेलाचे टँकर पलटी; अपघातात दोन ठार, तीन जखमी

या अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन कार आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. टँकरमधून तेल रस्त्यावर सांडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर पडलेल्या तेलावर माती टाकण्याचे काम सुरू आहे.

पुण्याकडून खोपोली एक्झिट मार्गे जाणाऱ्या मुंबई मार्गावर उतारावर तेलाचा टँकर शिळ फाटा येथे आला असता ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर पलटी झाला. यामुळे हा टँकर दोन ट्रक आणि पीकअप व्हॅनला धडकला तसेच बाजूच्या कार आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात पीकअप आणि ट्रकमधील दोन जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच खालापूरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुगणालयात दाखल केले. रस्त्यावर तेल गळती झाल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाचे जवान, देवदूत यंत्रणा यांनी रस्त्यावर फवारणी केली. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.