ETV Bharat / state

कोरोनाच्या भीतीने डॉक्टरांचेच मैदानातून पलायन; रायगडमध्ये दोघांनी दिले राजीनामे - कोरोना व्हायरस बातमी

रायगडात सध्या एक कोरोनाबाधित आहे. असे असूनही जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत आहे. जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, पेण, माणगाव, महाड याठिकाणी कोरोनाबाधितांसाठी विलगिकरण, अलगिकरण कक्षाची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय यांच्या ड्युटी लावण्यात आलेल्या आहेत.

two-doctors-resign-in-raigad-due-to-corona-virus
कोरोनाच्या भीतीने डॉक्टरांचेच मैदानातून पलायन
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:43 PM IST

रायगड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. असे असताना, रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी आपले कर्तव्य विसरून कोरोनाविरोधात सुरू असलेल्या युद्धातून पलायन केले आहे. डॉक्टरांच्या या कृत्याने डॉक्टरी पेशाला काळिमा फासली आहे. डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे अशी दोघांची नावे असून त्यांनी आपले राजीनामे रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत.

हेही वाचा- लढा कोरोनाविरुद्धचा : हिमाचल सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार

रायगडात सध्या एक कोरोनाबाधित आहे. असे असूनही जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत आहे. जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, पेण, माणगाव, महाड याठिकाणी कोरोनाबाधितांसाठी विलगिकरण, विलगीकरण कक्षाची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय यांच्या ड्युटी लावण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारीही घेण्यात आलेली आहे.

डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे हे दोघेही जिल्हा सामान्य रुग्णालयात फिझिशियन वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने त्याची ड्युटी लावण्यात आलेली होती. मात्र, ही ड्युटी नको म्हणून घाबरून दोघांनीही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे आपले राजीनामे दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती देशात लागू असताना, डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे. त्यातच डॉ. आरसरे आणि डॉ. हिवरे यांनी आपली जबाबदारी झटकून मैदानातून पळ काढला आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत डॉक्टरांची गरज असताना, दोघे पळ काढत असल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे नवीन डॉक्टरांची भरती प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी आपली जबाबदारी झटकून राजीनामा दिला आहे. माझ्याकडे त्यांचा राजीनामा आल्यानंतर त्यांनी अशा कठीण परिस्थितीत त्वरित रुजू व्हावे, असे मी त्यांना आदेश देणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही त्यांचा अहवाल पाठविणार आहे. त्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार असतीेलजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.