रायगड - अलिबाग जवळच्या खानावमधील सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत आज वसुबारसनिमित्त गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. विशेष म्हणजे दोन गर्भवती गायींची ओटी भरणे कार्यक्रम करून डोहाळे जेवणही करण्यात आले. महिलांनी डोहाळे गीतही यानिमित्ताने सादर केले. जिल्ह्यातील गाभण गायींची ओटी भरणे आणि डोहाळे जेवण करण्याचा सोहळा पहिल्यांदाच झाला आहे.
वसुबारस दिवस : दोन गर्भवती गायींचे पार पडले डोहाळे जेवण - वसुबारस दिवस गायीचे पूजन रायगड
वसुबारस दिवस हा म्हणजे गायीचे पूजन करण्याचा दिवस. या दिवशी गोपूजन करून आपली संस्कृती जपली जाते. तसेच वसुबारस या दिवशी गर्भवती गायींची धर्मानुसार पूजा करावी, असे शास्त्र सांगत आहे. त्यादृष्टीने गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला. या गायींना फुलांनी सजवण्यात आले नंतर आरती करण्यात आली.
रायगड