ETV Bharat / state

रायगडमध्ये फणसाड धरणात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू - murud

ओंकार आणि गौरव बिरवाडकर हे दोघेही उन्हाळी सुट्टीनिमित्त मांडला येथे नातेवाईकांकडे आले होते. आज सकाळी हे दोघे भाऊ, नातेवाईक आणि गावातील तरुण फणसाड धरणावर फिरण्यास व पोहण्यास गेले होते.

रायगडमध्ये फणसाड धरणात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू
author img

By

Published : May 18, 2019, 8:01 PM IST

रायगड - मुरूड तालुक्यातील फणसाड धरणात रोहा तालुक्यातील सारसोली गावच्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. आज (१८ मे) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओंकार बिरवाडकर (वय १७) आणि गौरव बिरवाडकर (वय १३) अशी या दोन भावांची नावे आहेत. बुडालेल्या दोघांचेही मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.

ओंकार आणि गौरव बिरवाडकर हे दोघेही उन्हाळी सुट्टीनिमित्त मांडला येथे नातेवाईकांकडे आले होते. आज सकाळी हे दोघे भाऊ, नातेवाईक आणि गावातील तरुण फणसाड धरणावर फिरण्यास व पोहण्यास गेले होते. सर्वजण दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धरणातून पोहून बाहेर पडले. त्याचवेळी गौरव याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्यावेळी मोठा भाऊ ओंकार त्याचा हात पकडून खेचू लागला. मात्र, हे दोघेही पाण्यात पडले.

गौरव व ओंकार पाण्यात बुडू लागताच सोबत असलेल्या तरुणांनी आरडा-ओरड केली. त्यानंतर ग्रामस्थानी घटनास्थळी जाऊन दोघांचा शोध घेतला. त्यानंतर २-३ तासांनी दोघांना बाहेर काढून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:फणसाड धरणात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू

रायगड : मुरूड तालुक्यतील फणसाड धरणात रोहा तालुक्यतील सारसोली येथील दोन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही बुडालेल्या युवकांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.Body:रोहा तालुक्यातील सारसोली येथील ओंकार बिरवाडकर (17) व गौरव बिरवाडकर (13) हे सख्ये भाऊ उन्हाळी सुट्टी निमित्त मांडला येथे नातेवाईकांकडे आले होते. आज सकाळी हे दोघे भाऊ, नातेवाईक व गावातील तरुण फणसाड धरणावर फिरण्यास व पोहण्यास गेले होते. सर्वजण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धरणातून पोहून बाहेर पडले. त्याचवेळी गौरव याचा पाय घसरून पाण्यात पडू लागला. त्यावेळी मोठा भाऊ ओंकार याने त्याचा हात पकडून खेचू लागला मात्र दोघेही पाण्यात पडले.Conclusion:गौरव व ओंकार पाण्यात पडून बुडू लागताच सोबत असलेल्या तरुणांनी आरडा ओरड केली. त्यानंतर ग्रामस्थानी घटनास्थळी जाऊन दोघांचा शोध घेतला. त्यानंतर दोन तीन तासाने दोघांना बाहेर काढून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.