ETV Bharat / state

वाई ते महाड दीडशे किलोमीटर अंतर पायी कापले; आदिवासी बांधव क्वारंटाईन

सातारा जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने आदिवासी कुटुंबाला उघड्यावर राहणेही कठीण झाल्याने आणि काम नसल्याने उपासमारीने त्यांचे हाल होत आहेत. यामुळे त्यांनी वाई ते महाड हा दीडशे ते दोनशे किलोमीटरचा रस्ता पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

वाई ते महाड दीडशे किलोमीटर अंतर पायी कापले; आदिवासी बांधव क्वारंटाईन
वाई ते महाड दीडशे किलोमीटर अंतर पायी कापले; आदिवासी बांधव क्वारंटाईन
author img

By

Published : Apr 26, 2020, 4:00 PM IST

रायगड - जिल्ह्यातील महाड तालुक्यातील 136 आदिवासी बांधव कामानिमित्त सातारा जिल्ह्यात गेले असताना लॉकडाऊनमुळे अडकले होते. या आदिवासी बांधवांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची उपासमार होऊ लागल्याने सातारा वाई येथून दीडशे ते दोनशे किमी पायी चालत आपल्या गावी परतले असून प्रशासनाने त्यांना जिल्ह्याच्या वेशीवर अडवून त्यांची आरोग्य तपासणी करून सर्व आदिवासी बांधवांना होम क्वारंटाईन करून ठेवले आहे.

वाई ते महाड दीडशे किलोमीटर अंतर पायी कापले; आदिवासी बांधव क्वारंटाईन

महाड तालुक्यातील दहीवड, भांदे, वाघोली या गावातील 136 जण आपल्या कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. वाई परिसरात चिंच काढण्याचे काम हे आदिवासी बांधव करीत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 22 मार्चपासून सगळीकडे लॉकडाऊन लागू झाल्याने हे आदिवासी बांधव अडकले. त्यातच सातारा जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने आदिवासी कुटुंबाला उघड्यावर राहणेही कठीण झाल्याने आणि काम नसल्याने उपासमारीने त्यांचे हाल होत आहेत. यामुळे त्यांनी वाई ते महाड हा दीडशे ते दोनशे किलोमीटरचा रस्ता पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

आदिवासी बांधव हे भोर घाटातून चालत आले असता महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिलिंग पॉईंटजवळ रात्री दोनच्या सुमारास आले. पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांची विचारपूस करून त्यांना थांबण्यास सांगून आरोग्य आणि तालुका प्रशासनास कळविले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून सर्वांची तपासणी करून होम क्वारंटाईन शिक्के मारून 14 दिवस घरातच राहण्यास सांगितले असल्याने त्याचा जीव भांड्यात पडला आहे. 114 स्त्री पुरुषासह 22 लहान बालक हे पायी चालत येऊन आपल्या गावी पोहोचले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.