रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र,साडे दहा वाजण्याच्या सुमारास हे झाड हटवल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी वादळी वारा आणि पावसामुळे झाड पडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, कोकणातील वाहतूक विन्हेरे, तुळशीखिंड मार्गे वळवण्यात आली होती. घटनास्थळी महामार्ग विभाग तसेच ठेकेदार कंपनीचे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन हे झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर साडे दहा वाजण्याच्या सुमारास हे झाड रस्त्यावरुन बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले.
दैव बलवत्तर !
ज्या झायलो गाडीवर हे झाड पडले, त्या गाडीतून प्रवास करणारे पती पत्नी गाडी पंक्चर झाल्यामुळे पोलादपूर पंचायत समिती समोर पंक्चर काढण्यासाठी गाडीतून खाली उतरले होते. त्यामुळे ते या घटनेत थोडक्यात बचावले. या अपघातात कारचे व 3 मोटार सायकलचे नुकसान झाले आहे.