ETV Bharat / state

ट्रेलर चोरी करणारी टोळी अटकेत; 59 लाखांचा माल जप्त - पनवेल गुन्हे बातमी

नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण 8-10 महिन्यांपासून वाढले होते. तळोजा पोलीस ठाण्यात 12 नोव्हेंबरला एक ट्रॉली चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

ट्रेलर चोरी करणारी टोळी अटकेत
author img

By

Published : Nov 19, 2019, 1:31 PM IST

पनवेल - तळोजा, उरण, पनवेल, न्हावा-शेवा परिसरातून ट्रेलर चोरून त्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी तळोजा पोलिसांनी केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी 15 ट्रॉली आणि 59 लाखांचा माल जप्त केला आहे. या टोळीने अशाच पद्धतीने अनेक ट्रेलर चोरून त्यांची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी दिली.

ट्रेलर चोरी करणारी टोळी अटकेत

नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण 8-10 महिन्यांपासून वाढले होते. तळोजा पोलीस ठाण्यात 12 नोव्हेंबरला एक ट्रॉली चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास करताना उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे व विठ्ठल दामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी एक पथक तयार करून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.

हेही वाचा - पनवेल-वसई मार्गावर लोकलच्या 170 फेऱ्या लवकरच

यात एक ट्रॉली वाहून नेणारा घोडा त्यावेळी जात असल्याचे लक्षात आले. त्याचा क्रमांक मिळवून मालकाजवळ चौकशी केली असता, त्याने आपल्याला काही माहीत नाही, तसेच तो चालकाच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. चालकाला ताब्यात घेतल्यावर दोघांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. तेव्हा हे दोघे रस्त्याच्या कडेला उभी असलेली ट्रॉली चोरून तिचा रंग बदलून भाड्याने देण्याचा धंदा करत असल्याचे उघडकीस आले. यामध्ये आणखी 2 आरोपी असून त्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - सुरक्षा रक्षकानेच केली युनिव्हर्सिटीत चोरी, पनवेलच्या अमिटी युनिव्हर्सिटीतील प्रकार

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, सहाय्यक निरीक्षक सुधीर निकम, उपनिरीक्षक सतीश घुगे, हवालदार थोरात, शिंदे, पाटील, चौगुले, नाईक पवार, पाटील, शिंदे, होणवार, टिके, सोनवणे, पाटील, राठोड, खेडेकर, जाधव यांनी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18 लाखांचा मुद्देमाल, उरण 14 लाख, न्हावाशेवा व पनवेल शहर प्रत्येकी 7 लाख, कामोठे व हिललाइन ठाणे प्रत्येकी 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेल्या मुद्देमालापैकी 11 गुन्ह्यांची नोंद झाली होती. एक गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे आरोपींकडून समजले.

Intro:सोबत व्हिडीओ आणि बाईट जोडली आहे

पनवेल

तळोजा, उरण, पनवेल, न्हावा-शेवा परिसरातून ट्रेलर चोरून त्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी तळोजा पोलिसांनी केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी 15 ट्रॉली आणि 60 59 लाखांचा माल जप्त केले असून या टोळीने अशाच पद्धतीने अनेक ट्रेलर चोरून त्यांची विल्हेवाट लावले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी दिली आहे.Body:नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण आठ-दहा महिन्यांपासून वाढले होते. तळोजा पोलीस ठाण्यात 12 नोव्हेंबर रोजी एक ट्रॉली चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला. याचा तपास करताना उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे व विठ्ठल दामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी एक पथक तयार करून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एक ट्रॉली वाहून नेणारा घोडा त्यावेळी जात असल्याचे लक्षात आले. त्याचा क्रमांक मिळवून मालकाजवळ चौकशी केली असता त्याने आपल्याला काही माहीत नाही, तसेच तो चालकाच्या ताब्यात असल्याची माहिती दिली. चालकाला ताब्यात घेतल्यावर दोघांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली, तेव्हा हे दोघे रस्त्याच्या कडेला उभी असलेली ट्रॉली चोरून तिचा रंग बदलून भाड्याने देण्याचा धंदा करीत असल्याचे उघडकीस आले. यामध्ये आणखी दोन आरोपी असून त्यांचा शोध सुरू आहे.Conclusion:पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, सहाय्यक निरीक्षक सुधीर निकम, उपनिरीक्षक सतीश घुगे, हवालदार थोरात, शिंदे, पाटील, चौगुले, नाईक पवार, पाटील, शिंदे, होणवार, टिके, सोनवणे, पाटील, राठोड, खेडेकर, जाधव यांनी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 18 लाखांचा मुद्देमाल, उरण 14 लाख, न्हावाशेवा व पनवेल शहर प्रत्येकी सात लाख, कामोठे व हिललाइन ठाणे प्रत्येकी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेल्या मुद्देमालापैकी 11 गुन्ह्यांची नोंद झाली होती. एक गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे आरोपींकडून समजले. तीन ट्रॉली कोठून चोरल्या त्याचा तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.