ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या 4 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा - मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

दिवाळीची सुट्टी व भाऊबीज असल्याने मुंबईसह उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमान्यांनी पर्यटनासाठी अलिबाग, मुरुड, गोवा, कोकण, महाबळेश्‍वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

झालेली वाहतुक कोंडी
author img

By

Published : Oct 29, 2019, 6:07 PM IST

Updated : Oct 29, 2019, 8:36 PM IST

रायगड - नुकतीच झालेली निवडणूक, दिवाळीची सुट्टी व भाऊबीज असल्याने मुंबईसह उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमान्यांनी पर्यटनासाठी अलिबाग, मुरुड, गोवा, कोकण, महाबळेश्‍वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली आहे. एसटीसह खासगी गाड्यांनी हे चाकरमानी, पर्यटक निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे चाकरमानी, पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

जिल्हा प्रशासन व वाहतूक शाखेच्या नियोजनाचाही अभाव असल्याने वाहतूक कोंडी दूर करणे त्रासदायक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली वाहने, पुढे वाहने काढण्याच्या प्रयत्नात रस्ता अडवणे, रस्त्यावर वाहने बंद पडली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील गडब ते वडखळ आणि पेण ते तरणखोप या ठिकाणांहून वाहनांच्या जवळ-जवळ 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबल्याने एकतर्फी महामार्गावरून वाहने चालवणे मोठे जिकीरीचे बनले होते. अनेक ठिकाणी छोटी वाहने पुढे काढण्याच्या नादात वाहतूक कोंडीत भर पडत होती. वाहतूक पोलिसांची तुरळक यंत्रणा रस्त्यावर असली तरी नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली. दैनंदिन प्रवास करणारी एस. टी.ची सेवा, अवजड माल वाहतूक करणारी वाहने यांची भरीस भर पडली आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली अनेक वर्षे धिम्यागतीने सुरू असलेले मुंबई- गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीही वाहन चालक व प्रवाशांकडून होत आहे.

Intro:मुंबई- गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी; पर्यटकाची अलिबाग, मुरुड, गोवा, कोकणाला पंसती

वाहनांच्या 4 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा

पेण-रायगड

नुकतीच झालेली निवडणूक, दिवाळीची सुट्टी व भाऊबिज असल्याने मुंबईसह उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमान्यांनी पर्यटनासाठी अलिबाग, मुरुड, गोवा, कोकणात तसेच महाबळेश्‍वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली आहे. एसटी सह खासगी गाड्यांनी हे चाकरमानी, पर्यटक निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे चाकरमानी, पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात जिल्हा प्रशासन व वाहतूक शाखेच्या नियोजनाचाही अभाव असल्याने वाहतूक कोंडी दूर करणे त्रासदायक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली वाहने, वाहनचालकांचा बेदरकारपणा, पुढे वाहने काढण्याच्या प्रयत्नात रस्ता अडवणे व त्याच प्रमाणात अचानक रस्त्यावर बंद पडलेली वाहने, यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील गडब ते वडखळ आणि पेण ते तरणखोप या ठिकाणांहून वाहनांच्या जवळ जवळ 4 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. मुंबई-गोवा महामार्गावर पावसाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबल्याने एकतर्फी महामार्गावरून वाहने चालवणे मोठे जिकीरीचे बनले होते. अनेक ठिकाणी छोटी वाहने पुढे काढण्याच्या नादात वाहतुक कोंडीत भर पडत होती. वाहतुक पोलिसांची तुरळक यंत्रणा रस्त्यावर असली तरी नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.Body:पेण, तरणखोप, अंतोरा फाटा, रामवाडी बसस्थानक, असल्याने महामार्गावरची दररोज वाहनांचे ताफे यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोडींची समस्या उद्भवली होती. मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओढा अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन, मुरुड या समुद्रकिनारपट्टीकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली. दैनंदिन प्रवास करणारी एस.टी.ची बससेवा, अवजड माल वाहू वाहने यांची भरीस भर पडली आहे. मात्र ही वाहतुक कोंडी सोडविताना वाहतुक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.Conclusion:गेली अनेक वर्षे धिम्यागतीने सुरू असलेले मुंबई- गोवा महामार्गाचे रुंदिकरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणीही वाहन चालक व प्रवाशांकडुन होत आहे.
Last Updated : Oct 29, 2019, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.