ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल - रायगड नववर्ष स्वागत न्यूज

31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्याला पसंती देत आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल झाले असून घोडा, उंट सफारी, बोटिंग, केटीएम रायडिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.

पर्यटक
पर्यटक
author img

By

Published : Dec 29, 2019, 7:09 PM IST

रायगड - नववर्षाच्या स्वागताला रायगड जिल्ह्यात पर्यटकांचे आगमन झाले असून समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. समुद्रकिनारी पर्यटक मौजमजा करताना पाहायला मिळत आहेत. आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यवसायिकांना भरभराटीचे दिवस आले आहेत. पर्यटकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता स्थानिक आणि जिल्हा पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये पर्यटकांची गर्दी

31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्याला पसंती देत आहेत. 31 डिसेंबर (मंगळवार) कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीच अनेकजण नववर्ष साजरे करण्यासाठी आले आहेत.

हेही वाचा - अलिबागमध्ये रंगणार 'शोध मराठी मनाचा' साहित्य संमेलन

जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल झाले असून घोडा, उंट सफारी, बोटिंग, केटीएम रायडिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. कुलाबा किल्ल्यालाही पर्यटक भेट देत आहेत. वाहनांची संख्याही वाढल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. जिल्हा वाहतूक पोलिसही वाहनांची कोंडी सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्थानिक प्रशासनानेही समुद्र किनारी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पोलिसांनी पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसही हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा व्यवसाय तेजीत आला आहे. मटण, चिकन, मासे बाजार, मद्याच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे.

Intro:जिल्ह्यातील समुद्र किनारे, पर्यटन स्थळे पर्यटकांनी हाऊसफुल

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून प्रेक्षणीय स्थळांवर चोख बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल

रायगड : नववर्षाच्या स्वागताला जिल्ह्यात पर्यटकांचे आगमन झाले असून समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची जत्रा भरली आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारी पर्यटक मौजमजा करताना पाहायला मिळत आहेत. नवं वर्षाच्या स्वागताला आलेले पर्यटकांनी स्थानिक व्यवसायिकांना भरभराटीचे दिवस आलेले आहेत. पर्यटकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता स्थानिक आणि जिल्हा पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहेत.

Body:31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रायगड जिल्ह्याला पहिली पसंती देत आहेत. 31 डिसेंबर मंगळवारी आली असल्याने आजच रविवारी 29 डिसेंबरलाच अनेकजण नववर्ष साजरे करण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवसांपासून दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल झाले असून घोडा, उंट सफारी, बोटिंग, केटीएम रायडिंगचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत. तर बच्चे कंपनीही पाण्यात भिजत मजा करीत आहेत. पराग्लायडिंगचा आनंदही पर्यटक घेत आहेत. कुलाबा किल्यावरही पर्यटक जाऊन ऐतिहासिक किल्या पाहत आहेत. Conclusion:समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू याठिकाणीही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाली असून वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. जिल्हा वाहतूक पोलिसही वाहनांची कोंडी सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. स्थानिक प्रशासनानेही समुद्र किनारी जीवरक्षक तैनात केलेले आहेत. पोलिसांनीही पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

पर्यटक लाखोंच्या संख्येने दाखल झाल्याने जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसही हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा व्यवसायही तेजीत आला आहे. मटण, चिकन मासे बाजार, मद्याच्या दुकानातही गर्दी पाहायला मिळत आहे.

बाईट 1 : अमृता पाटील, पर्यटक, सांगली

बाईट 2 : प्रथमेश सारंग, जीवरक्षक

बाईट 3 : मंदार पावशे, स्थानिक व्यवसायिक

वाक थ्रू
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.