रायगड - पोयनाड नागोठणे रस्त्यावरील रिलायन्स कंपनीच्या कडसुरे गेटनजीक सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली असून एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी ही आग लागली आहे. रिलायन्स कंपनीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग ही दोन ते तीन ठिकाणी लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
वेलशेत पोलीस दुरक्षेत्र नजीक ही आग अधिक भडकली आहे. मात्र, आग नक्की कशाने लागली याचे कारण कळले नाही. याठीकाणी रिलायन्स कंपनीचे साहित्य असल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू आहेत.