ETV Bharat / state

रायगडमध्ये पुलाच्या खांबावर दहशतवादाशी संबंधीत मजकूर आढळल्याने खळबळ

उरण तालुक्यातील खोपटा येथील एका पुलाच्या खांबावर दहशतवादाशी संबंधीत मजकुर आणि काही आकृत्या आढळल्या आहेत. मजकुरामध्ये इसिस तसेच दहशतवादी अबू बकर अल बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

पुलाच्या खांबावर दहशतवादाशी संबंधित मजकूर
author img

By

Published : Jun 3, 2019, 9:47 PM IST

रायगड - उरण तालुक्यातील खोपटा येथील एका पुलाच्या खांबावर दहशतवादाशी संबंधित मजकुर आणि काही आकृत्या आढळल्या आहेत. मजकुरामध्ये इसिस तसेच दहशतवादी अबू बकर अल बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. उरण पोलिसांनी यासंबधी तपास सुरु केला आहे.

उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र असे प्रमुख व संवेदनशील प्रकल्प आहेत. त्यामुळे खोपटा येथील पुलाच्या भिंतीवर लिहलेल्या दहशतवादाशी संबंधित मजकुराने खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांचा उरणसारख्या भागात दहशतवादी कारवाया करण्याचा उद्देश आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुलाच्या खांबावर आढळला दहशतवादाशी संबंधित मजकूर

खोपटा येथील पुलाच्या भिंतीवर काळ्या रंगाच्या मार्करने ३ भागात हे संदेश लिहिले आहेत. तसेच या संदेशामध्ये धोनी जन्नत मे आऊट, आम आदमी पार्टी, केजरीवाल या सारख्या सांकेतिक नावांचा उल्लेख आहे. तसेच दहशतवादी हाफिज सईद, रहिम कटोरी, राम कटोरी यांचा उल्लेख करण्यात आला असून, देवनागरी व इंग्रजीमध्ये सांकेतिक भाषेत आकडे लिहिले आहेत.

संदेशाच्या बाजूला एक आकृती काढली असून, त्यामध्ये इंम्पोर्ट, एक्सपोर्ट जहाज पोर्ट (जेएनपीटी), एअरपोर्ट, गॅस पेट्रोल दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हे संदेश लिहिले आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. हस्ताक्षरावरून आणि भाषेवरून तरी हा मजकूर कोणी स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत सगळ्या शक्यता तपासून पाहत असून, त्या दिशेने तपास सुरू असल्याचे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले.

पुलाच्या खांबावर दहशतवादी संबंधित संशयित मजकुराने खळबळ

उरण तालुक्यातील खोपटा येथील घटना

उरण पोलिसांचा तपास सुरू

रायगड : उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र असे प्रमुख व संवेदनशील प्रकल्प असताना खोपटा पुलाच्या एका खांबावरील भिंतीवर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे उरणसारख्या भागात दहशतवादी कारवाया करण्याचा उद्देश असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मजकुरामध्ये इसिस तसेच दहशतवादी अबू बकर अल बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाच गांभीर्य वाढले आहे. रविवार या बाबत उरण पोलिसांना या बाबतची माहिती मिळाल्यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखून चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी, विद्युत केंद्र या सारखे संवेदनशील व महत्वाचे प्रकल्प असल्याने या संदेशाला महत्व प्राप्त झाले आहे. काळ्या रंगाच्या मार्करने तिन भागात हे संदेश लिहिले आहेत. तसेच या संदेशामध्ये धोनी जन्नत मे आऊट, आम आदमी पार्टी, केजरीवाल या सारखी सांकेतिक नावांचा उल्लेख आहे. तसेच दहशतवादी हाफिज सईद, रहिम कटोरी, राम कटोरी यांचा उल्लेख करण्यात आला असून देवनागरी व इंग्रजीमध्ये सांकेतिक भाषेत आकडे लिहिले आहेत.

संदेशाचे बाजूला एक आकृती काढली असून त्यामध्ये इंम्पोर्ट, एक्सपोर्ट जहाज पोर्ट (जेएनपीटी), एअर पोर्ट, गॅस पेट्रोल दाखविण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका आकृतीत कुर्ला गोरखपूर असा उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हे संदेश लिहिले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियरच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. हस्ताक्षरावरून आणि भाषेवरून तरी हा मजकूर कोणी स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या बाबत सगळ्या शक्यता तपासून पाहत असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.