ETV Bharat / state

सरसगडावरील कार्यक्रमात नाचवल्या तलवारी, कोरोनाच्या नियमावलीला फाटा

author img

By

Published : Dec 28, 2020, 4:15 PM IST

गडकिल्ल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा तेथे  शिवभक्त जावेत व गडकिल्ल्यांचे स्वच्छता संवर्धन करावे, या उद्देशाने वेध सह्याद्री तर्फे सरसगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी गडावर दिशादर्शक फलक व किल्ल्याच्या नकाशाचे फलक लावण्यात आले. मात्र...

सरसगडावरील कार्यक्रमात नाचवल्या तलवारी
सरसगडावरील कार्यक्रमात नाचवल्या तलवारी

रायगड - पाली येथील सरसगडावर शिवप्रेमींनीच तलवारी नाचवण्याचा प्रकार घडला. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. वेध सह्याद्री प्रतिष्ठान सदस्यांनी सरस गडावर श्रमदान केल्यानंतर भंडारा उधळत तलवारी नाचविल्या.

सरसगडावरील कार्यक्रमात नाचवल्या तलवारी
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे गडावर श्रमदान मोहीम-वेध सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यातील पाली येथील सरसगड किल्ल्यावर श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी उघड्या तलवारी नाचवण्याचा प्रकार याठिकाणी घडला. तसेच या कार्यक्रमासाठी पाली पोलीस स्थानकाची परवानगी घेण्यात आली नव्हती. यावेळी भंडारा उधळत कोरोनाच्या नियमांना फाटा देण्यात आला होता.

एकीकडे गडाचे संवर्धन तर दुसरीकडे नियमाचे उल्लंघन-

गडकिल्ल्यांचा प्रसार व प्रचार व्हावा तेथे शिवभक्त जावेत व गडकिल्ल्यांचे स्वच्छता संवर्धन करावे, या उद्देशाने वेध सह्याद्री तर्फे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी गडावर दिशादर्शक फलक व किल्ल्याच्या नकाशाचे फलक लावण्यात आले. मात्र तलवारी नाचवल्याने व कोरोनाच्या नियमांना फाटा दिल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय झाला आहे.

शिवप्रेमींचा इशारा-

गड किल्ले हे अस्मितेचे प्रतीक आहेत, त्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. प्रबोधन, स्वछता मोहीम व इतर लोकोपयोगी उपक्रम राबविणे गडाला साजेसे ठरतात. मात्र कोणतीही परवानगी न घेता तलवारी नाचविणे. हे योग्य नसून गडावर पुन्हा, असे प्रकार घडल्यास हयगय केली जाणार नाही, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

तलवारी आणा असे सांगितले नाही-

पोस्ट वाचून बरीच मंडळी गडावर आली होती. त्यातील काहींनी त्यांच्या सोबत तलवारी आणल्या होत्या. वेध सह्याद्रीच्या पोस्टमध्ये तलवारी आणा असे कोणालाही सांगितले नव्हते, असे वेध सह्याद्रीचे अध्यक्ष आकाश घरडे यांनी म्हटले आहे.

साफसफाईसाठी वन विभागाची तोंडी परवानगी-

सरगडावर कार्यक्रम झाला याची आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती. अथवा कोणतीही परवानगी देखील घेतली नाही. तसेच कोणत्याही कार्यक्रमात तलवारी फिरविणे बेकायदेशीर आहे. अशा गोष्टींना आळा बसविण्यासाठी याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल.
अशी प्रतिक्रिया पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे, यांनी दिली आहे. तसेच सरसगडावर फक्त साफसफाई केली जाईल व झेंडा लावण्यात येईल, अशी तोंडी माहिती देण्यात आली होती. लेखी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, अशी माहिती पाली वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा- ईडीच्या नोटिसीसाठी माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय -संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.