ETV Bharat / state

समृद्ध पर्यावरणासाठी विद्यार्थ्यांची सायकल अभियान रॅली - For a better environment Student Cycle Rally

अलिबाग ते बाणकोट या समृध्द समुद्र किनाऱ्यावरील कांदळवन, मुरुडचे फणसाड अभयारण्य आणि निसर्ग विज्ञानाविषयी माहिती मुलांना त्यांच्या शालेय जीवनात मिळणे महत्वाचे आहे. याचाच विचार करून सिस्केप संस्था आणि अलिबाग महाड युथ हॉस्टेल युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायकल अभियान रॅली
सायकल अभियान रॅली
author img

By

Published : Feb 19, 2020, 11:50 AM IST

रायगड - युथ हॉस्टेल महाड, अलिबाग युनिट आणि सिस्केप संस्थेमार्फत समृध्द पर्यावरणासाठी सायकल अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून आज अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून या सायकल रॅलीला आमदार महेंद्र दळवी यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या सायकल रॅलीचा अलिबाग-मुरुड ते रायगड किल्ला असा 19 ते 21 फेब्रुवारी असा तीन दिवस प्रवास होणार आहे. या तीन दिवसाच्या सायकलिंग प्रवासात रायगड जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधन कण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

समृद्ध पर्यावरणासाठी विद्यार्थ्यांची सायकल अभियान रॅली

अलिबाग ते बाणकोट या समृद्ध समुद्र किनाऱ्यावरील कांदळवन, मुरुडचे फणसाड अभयारण्य आणि निसर्ग विज्ञानाविषयी माहिती मुलांना त्यांच्या शालेय जीवनात मिळणे महत्त्वाचे आहे. याचाच विचार करून सिस्केप संस्था आणि अलिबाग महाड युथ हॉस्टेल युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथून आमदार महेंद्र दळवी यांचे हस्ते युथ होस्टेलचा स्वागत ध्वज दाखवून करण्यात आला.

नागाव रेवदंडा कोर्लईमार्गे सायकल अभियान समुद्र किनारी भागातील शालेय विद्यार्थ्यांना जनजागृती कार्यक्रमाद्वारे सायकलपट्टू मार्गदर्शन करतील. ठिकठिकाणी सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायतीमार्फत सायकल अभियान उपक्रमाचे स्वागत करण्यात येणार आहे. आज (दि. 19) ही सायकल मोहीम सायंकाळी 6 वाजता मुरूड येथे पोहचेल व तेथे ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत होईल. त्यानंतर दरबार हाॅल येथे सायंकाळी 7.30 वाजता मुरूड येथील पर्यावरणप्रेमींसाठी विनामूल्य पर्यावरणविषयक स्लाईड शोचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता पद्मदुर्ग दर्शनानंतर राजपुरी किनारा स्वच्छता मोहीम करण्यात येईल.

हेही वाचा - 'जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवू शकत नाहीत'

त्यानंतर आगरदांडा मार्गे कोळंबी प्रकल्प व कांदळवनाची माहिती घेत मांदाड खाडीच्या मुखाशी असलेल्या कुडा मांदाड लेणीचे दर्शन घेतील. तळा येथील ग्रामस्थांकडून अभियानाचे स्वागत कालिकादेवी मंदिर येथे होईल. त्याठिकाणी तळागडाचा इतिहास व त्यासंबंधीचे शिल्पांची माहिती घेऊन इंदापूर येथे शिल्पकार राजेश कुलकर्णी यांच्या आकार कँम्प साईटवर वस्ती होईल. दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थळ गांगवली येथून किल्ले रायगडकडे विद्यार्थी प्रस्थान करतील. पाचाड येथील जिजामाता समाधी येथे सरपंच संयोगिता गायकवाड यांचे हस्ते स्वागत होईल.

यावेळी रघुवीर देशमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. कोंझर मार्गे सायकलस्वार महाड येथील हुतात्मा स्मारक येथे सांगता होईल. यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, विनती ऑरगॅनिक्सचे उपाध्यक्ष महेश पुरोहीत, पत्रकार प्रविण कुलकर्णी, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डाॅ. आदित्य महामणकर, डाॅ. सुनिल नांदगांवकर, केईएस कै. दगडूशेठ पार्टे इंग्लिश मीडीयम स्कूलच्या संचालिका अनिताताई पार्टे, शाळेच्या मुख्याध्यापिका तेंडूलकर यांच्या उपस्थितीत समृद्ध पर्यावरण अभियानात सहभाग झालेल्या सायकलस्वारांचा कौतुक समारंभ होईल.

हेही वाचा - झुलवा पाळणा पाळणा..बाळ शिवाजीचा.. महाराष्ट्रातला सर्वात देखणा शिवजन्मोत्सव

या समृद्ध पर्यावरण सायकल अभियानात स्थानिकांसोबत पर्यावरण विषयक वैचारिक चळवळ व स्थानिक रोजगाराची संधी विषयी जनजागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येणार आहे. पर्यटन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि आंबा. नारळ, सुपारी व्यापार या विविध विषयांवर विद्यार्थी माहिती घेतील. मुरूड येथील पर्यटन महोत्सवाची नाळ असलेल्या पद्मदुर्ग जागर या उत्सवाची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी बोटीतून मुरूड ते पद्मदुर्ग असा जलप्रवास करतील. 750 किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टीवरील विविध प्रकारचे समुद्र प्रवाळी बेटे व खडकाळ बेटे हे आपले खरे वैभव आहे. याची ओळख विद्यार्थ्यांना या निमित्ताने होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.