रायगड - खोपोलीमध्ये भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. मंगळवारी खोपोली शहरातील सोमजाईवाडी परिसरात दोन लहान मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. यातील एका तीन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्याचा कुत्र्याने लचका तोडला. या घटनेत तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले असून एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - म्हणे.. आता मीच होणार ब्रँड अॅम्बेसेडर'
खोपोली शहरात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शहरातील विविध भागात अनेक नागरिकांना आणि लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.