ETV Bharat / state

दोन महिन्यानंतर 'लालपरी' आजपासून धावणार रस्त्यावर - raigad st bus news

एसटी बस सेवा सुरू करताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. जिल्ह्यातील आठ आगारातून ही 36 एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार असून रोज 324 फेऱ्या होणार आहेत.

st bus
एसटी बस
author img

By

Published : May 22, 2020, 11:11 AM IST

रायगड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 22 मार्चला संचारबंदी लागू केली होती. सार्वजनिक एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यानंतर रेड आणि कंटेंन्मेंट झोन वगळता जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा 22 मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातही आता 22 मे पासून लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्यास सज्ज झाली आहे.

एसटी बस सेवा सुरू करताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. जिल्ह्यातील आठ आगारातून ही 36 एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार असून रोज 324 फेऱ्या होणार आहेत.

22 मार्चपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. कोरोना हा गर्दीच्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असल्याने सर्व वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या. त्यामुळे एसटी बससेवाही बंद झाली होती. त्यामुळे करोडोचा आर्थिक फटका हा राज्य परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मात्र, आता परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी एसटी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातही 22 मे पासून एसटी बस सेवा सुरू होत असून आठ आगारातून तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी एसटी बस या निर्जंतुकीकरण करून प्रवाशाच्या सेवेसाठी धावणार आहेत. सोशल डिस्टनसिगचे पालन करून 50 टक्के प्रवासी बसमध्ये घेतले जाणार आहेत. अलिबाग आगारातून प्रथम अलिबाग पेण, अलिबाग रेवदंडा, अलिबाग रोहा या एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच महत्वाचे असेल तरच प्रवाशांनी बसने प्रवास करा, असे आवाहनही अलिबाग आगार प्रमुख अ व्ही वनारसे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.