ETV Bharat / state

कर्नाटक, गोंदिया आणि रावेर मधील मजुरांना घेऊन विशेष बस रवाना... - विशेष बस रायगड बातमी

मजुरांना राज्य परिवहन महामंडळामार्फत मोफत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कर्नाटक राज्यातील तसेच गोंदिया रावेरमधील मजुरांची माहिती मागवून त्याच्या राज्यात कळविले आहे.

special-bus-for-migrants-laborers
special-bus-for-migrants-laborers
author img

By

Published : May 12, 2020, 12:59 PM IST

रायगड - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे कर्नाटक राज्यातील 110 तर, गोंदिया आणि रावेरमधील 44 मजूर रायगडमध्ये अडकले होते. त्यांना आज विशेष एसटी बसने राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी बस रवाना झाली.

कर्नाटक, गोंदिया आणि रावेर मधील मजुरांना घेऊन विशेष बस रवाना...

हेही वाचा- चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले

जिल्ह्यात परराज्यातील हजारो नागरिक कामा-धंद्यासाठी आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केल्याने कामधंदा बंद झाला आहे. त्यामुळे परराज्यातील नागरिक इथेच अडकून पडले आहेत. सरकारने या मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

मजुरांना राज्य परिवहन महामंडळामार्फत मोफत राज्याच्या सीमेपर्यत सोडण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कर्नाटक राज्यातील तसेच गोंदिया रावेरमधील मजुरांची माहिती मागवून त्याच्या राज्यात कळविले आहे. त्यानुसार तेथील राज्यांनी परवानगी दिल्यानंतर अलिबाग येथून अक्कलकोटपर्यंत पाच तर गोंदिया आणि रावेरसाठी प्रत्येकी 2 बसेस मधून मजुरांना सीमेपर्यत सोडण्यात येणार आहे.

त्यानंतर तेथून कर्नाटक शासनाचे वाहन येऊन या मजुरांना त्याच्या मूळगावी सोडणार आहे. जिल्ह्यातील अलिबाग, कर्जतमधील तहसीलदार कार्यालयाकडून या मजुरांची जाण्याची, खाण्याची व्यवस्था एसटी महामंडळाच्या सहकार्याने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.