रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज संपन्न होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे आजचा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत साजरा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा परिषद मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन केले. तर भगव्या ध्वजाचे पूजन करून शिवस्वराज्य दिन साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचे उदघाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवराज्यभिषेक प्रतिमेचे पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन
पालकमंत्री अदिती तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर भगवा झेंडा उभारण्यात आला असून, त्याचे पूजन केले. जिल्हा परिषदेत शिवराज्यभिषक सोहळ्याच्या प्रतिमेचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य अतिरिक्त कार्यकारी रणवीर रघुवंशी, अध्यक्षा योगिता पारधी, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्यभिषक सोहळा