रायगड - राज्यात सर्वत्र परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. रायगड जिल्हा देखील याला अपवाद नसून, येथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. या मागणीसाठी अलिबाग तालुक्यातील शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेत त्यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, याबाबतचे निवेदन दिले.
हेही वाचा... जन्मदातीने भरथंडीत रस्त्यावर सोडले, मुलगा गमावलेल्या दाम्पत्यानी दिली मायेची उब
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रमाणेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपुऱ्या सोईसुविधांबाबत या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तकांची भेट घेत त्यांनाही निवेदन दिले. शिवसेनेच्या या शिष्टमंडळात शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, माजी सरपंच शंकर गुरव, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, मारुती भगत, सरपंच प्रफुल पाटील, नंदकुमार पाटील यांचा समावेश होता.
हेही वाचा... देशभरातील बीएसएनएल कर्मचारी संघटनांचे आज उपोषण
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतीचे नुकसान झाले. हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले. त्यामुळे शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा... जे पेरलं तेच उगवलं! वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांना निसर्गाचं उत्तरं - शालीनीताई पाटील
जिल्हा रुग्णालय हेच विविध समस्यांना ग्रासलेले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागत आहे. अथवा खासगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. या समस्येबाबत शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. अजित गवळी यांची भेट घेत, प्रश्न विचारले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार लवकरात लवकर सुधारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा... 'चार वजा तीन'... राष्ट्रवादीचे 3 आमदार स्वगृही
तुम्हीच रुग्णालयाला डॉक्टर द्या... जिल्हा शल्यचिकिस्तकांचे अजब उत्तर
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने ते कामावर येत नाही. डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत शासनाला कळविले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावर नवीन डॉक्टरांची भरती करण्याबाबत शिष्टमंडळाने सुचवले असता, तुम्हीच डॉक्टर द्या, असे अजब उत्तर डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले.