ETV Bharat / state

कृत्रिम पायाच्या आधाराने अपंगाला मिळाली उभारी, 'शिवआधार'च्या मदतीने गणेश चालणार २ पायांवर - jaipur foot

गणेशचे आई वडील हे मोलमजुरी करून घराचा खर्च भागवतात. त्यातही सुषमा, सुजाता, संदेश, गणेश आणि आई-वडील असा ६ जणांचा परिवार आहे. शिवआधार संस्थेच्या मदतीने यशस्वीपणे उपचार पार पडल्यानंतर गणेशला कृत्रिम पाय मिळाला.

गणेश सुरेश पवार १
author img

By

Published : May 9, 2019, 5:54 PM IST

पनवेल - शिरवली ग्रामपंचायतमधील कोंडप आदिवासी पाड्यावरचा ५ वर्षीय गणेश सुरेश पवारचा उजवा पाय चांगला आणि डाव्या गुडघ्यापासून खाली काहीच नाही, अशी अवस्था होती. पण अशा परिस्थितीतही शरीराची वाढ होत होती. अशा अवस्थेत कुबड्यांचा आधार घेत तो चालत होता. शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने तो आता दोन्ही पायांवर चालत आहे.

शिवआधार चॅरिटेबल संस्थेच्या आधाराने गणेश पवारला मिळाला कृत्रिम पाय

गणेशचे आई वडील हे मोलमजुरी करून घराचा खर्च भागवतात. त्यातही सुषमा, सुजाता, संदेश, गणेश आणि आई वडील असा ६ जणांचा परिवार आहे. आई-वडिलांकडे उपचारासाठी पैसे नव्हते. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे कोणाकडे पैसे मागताही येत नाहीत. गणेशला शिकण्याची ओढ होती. अपंगत्वामुळे शाळकरी मुले, मित्र मस्करी करतात. पण गणेश खचला नाही. परंतु, गणेशच्या घरच्यांनी पाय बरा करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत.

शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टने दिली मदत

शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके सामाजिक कार्यकर्ता म्हणुन गेली ३ ते ४ वर्षे याठिकाणी विविध उपक्रम राबवतात. एका सामाजिक उपक्रमादरम्यान कोंडप आदिवासी पाड्यावर गणेश पवारसोबत दिव्यांग मुलाची भेट झाली. त्यांनी दिव्यांग असलेल्या गणेशला कृत्रिम जयपुर फुट बसवण्याचे ठरवले आणि त्यासाठी गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना नोव्हेंबर २०१८ मध्ये पहिल्यांदा नेरुळ येथील शिवआधार संस्थेच्या अभ्यास केंद्रात आणले.

नवी मुंबई ते महालक्ष्मी (हाजीअली) येथे असलेल्या अखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनवर्सन संस्थान या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर ते मे २०१९ या काळात १८ ते २० वेळा शिवआधार संस्थेमार्फत गणेशला याठिकाणी उपचार करण्यात आले. यशस्वीपणे उपचार पार पडल्यानंतर गणेशला कृत्रिम पाय मिळाला. यामुळे अपंगत्व असलेला गणेश पवार कुठलाही आधार न घेता उभा राहिला. दुसरा पाय मिळाल्याने गणेशला खूप आनंद झाला. आता मी गावापासून दूर असलेल्या शाळेत जाणार असल्याचे सांगत गणेशने शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके, जालिंदर यमगर, अनिकेत वाघोदे, आकाश पाटील, आशुतोष बांदल, अजीत शेळके, अनिकेत देशमाने, निखील हजारे यांचे आभार मानले.

संस्थेमार्फत गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना आदिवासी पाड्यावरून आणणे, राहणे ,खाणे, प्रवास खर्च हा सर्व खर्च करण्यात आला. आखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनवर्सन संस्थान या सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले. शिवआधार संस्थेने केलेले प्रयत्न पाहून गणेशचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Intro:स्पेशल स्टोरी करावी. बातमीला व्हिडीओ आणि बाईट सोबत जोडले आहेत. उरलेले व्हिडीओ याच slug ने दुसऱ्या स्टोरीमध्ये पाठवत आहे.

पनवेल

जन्मत:च पायाची चुंबळ झालेली. एक पाय चांगला, डाव्या पायाला गुडघ्यापासून खाली पाय नव्हता. शरीर तर वाढत होते. तशाच अवस्थेत शाळेत जाणारा पनवेलच्या शिरवली ग्रामपंचायत मधल्या कोंडप आदिवासी पडल्यावरचा गणेश तर काठीचा आधार घेऊन चालत होता. नंतर कुबड्यांचा आधार घेत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरील शाळेत जात होता. शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रयत्नांनंतर त्याला कृत्रिम पाय मिळाला. आता तो कुबड्यांविना चालत शाळेत जाणार आहे. उजव्याच्या बरोबरीचा डाव कृत्रिम पाय जोडल्यानंतर चालताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
Body:पनवेलच्या शिरवली ग्रामपंचायतमधल्या कोंडप आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या पाच वर्षीय गणेश सुरेश पवार या मुलाची ही कहाणी. कातकरी आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या गणेश पवार याचे आई वडील हे मोलमजुरी करून घरखर्च कसाबसा भागवतात. त्यातही सुषमा,सुजाता संदेश आणि गणेश तसंच त्याचे आई वडील असा सहा जणांचा परिवार...
आई-वडिलांकडे उपचारासाठी पैसे नव्हते. घरची परिस्थीती नाजूक असल्यामुळे कोणाकडे पैसे मागताही येत नव्हते. गणेशला शिकण्याची ओढ होती. अपंगत्वामुळे शाळकरी मुले, मित्र मस्करी करीत पण नशिबाच्या थट्टेपुढे तो खचला नाही. पाय बरा करण्याचे आव्हान या कुटुंबापुढे होते.
अशातच शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके याठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणुन गेली तीन ते चार वर्षे याठिकाणी विविध उपक्रम राबवत असत. एका सामाजिक उपक्रमा दरम्यान कोंडप आदिवासी पाड्यावर गणेश पवार या पाच वर्षीय दिव्यांग मुलाची भेट झाली. अपंगत्व आल्यानंतर जीवन कसे होते, याची जाणीव त्यालाच होते, ज्याच्यावर ही वेळ आलेली आहे. दिव्यांग असलेल्या गणेशला कृत्रिम जयपुर फुट बसवण्याचे ठरले आणि त्यासाठी गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना नोव्हेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा नेरूळ येथील शिवआधार संस्थेच्या अभ्यास केंद्रात आणले. तेव्हापासुन नवी मुंबई ते महालक्ष्मी (हजीअली) येथे असलेल्या आखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनवर्सन संस्थान या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर ते मे 2019 या काळात 18 ते 20 वेळा शिवआधार संस्थे मार्फत गणेशला याठिकाणी घेऊन जाऊन उपचार व थेरपी घेण्यात आली. ती यशस्वीपणे पार पडली पडल्यानंतर गणेशला कृत्रीम पाय मिळाला. अपंगत्व असलेल्या पायाला जोडला आणि क्षणभरात गणेश पवार कुठलाही आधार न घेता उभा राहिला. कृत्रिम पायावर उभे राहिल्यानंतर गणेशच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच आनंदाची समाधानकारक लकेर उमटली होती. वयाच्या पाचव्या वर्षी दुसरा पाय मिळाल्याने खूप आनंद झालाय. आता मी गावापासून दूर असलेल्या शाळेत जाणार असल्याचे सांगत गणेशने
शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश शेळके, जालिंदर यमगर, अनिकेत वाघोदे, आकाश पाटील, आशुतोष बांदल, अजीत शेळके, अनिकेत देशमाने, निखील हजारे यांचे आभार मानले. Conclusion:
या कालावधीत संस्थे मार्फत गणेश व त्यांच्या कुटुंबीयांना आदिवासी पाड्यावरून आणणे, राहणे ,खाणे, प्रवास खर्च हा सर्व खर्च संस्थे मार्फत करण्यात आला. आखिल भारतीय भौतिक चिकित्सा एवं पुनवर्सन संस्थान या सरकारी हॉस्पिटलमधील डाॅक्टरांनी चांगले सहकार्य केले. शिवआधार संस्थेने केलेले प्रयत्न सफल झाले आणि लेकाचे व नातवाला
स्वतःच्या पायावर उभे राहिलेलं बघून संपुर्ण कुटुंब आणि गावकरी आनंदी होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.